मराठी बातम्या /बातम्या /देश /हिंदू साधू-संतांवर कसे केले जातात अंत्यसंस्कार?

हिंदू साधू-संतांवर कसे केले जातात अंत्यसंस्कार?

संन्यासी परंपरेत जलसमाधी आणि भूमीसमाधी देण्याची प्रथा आहे; मात्र वैष्णवांमध्ये याआधी अनेक मोठ्या संतांवर अग्निसंस्कार केले गेले आहेत.

संन्यासी परंपरेत जलसमाधी आणि भूमीसमाधी देण्याची प्रथा आहे; मात्र वैष्णवांमध्ये याआधी अनेक मोठ्या संतांवर अग्निसंस्कार केले गेले आहेत.

संन्यासी परंपरेत जलसमाधी आणि भूमीसमाधी देण्याची प्रथा आहे; मात्र वैष्णवांमध्ये याआधी अनेक मोठ्या संतांवर अग्निसंस्कार केले गेले आहेत.

  नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : या जगामध्ये जो जन्म (born) घेतो त्याचा मृत्यू (death) अटळ आहे. जगामध्ये अनेक धर्म आहेत आणि प्रत्येक धर्माचे (religions) रीतिरिवाज वेगवेगळे आहेत. प्रत्येक धर्मामध्ये मनुष्याच्या अंत्यसंस्काराच्याही (funerals) वेगवेगळ्या प्रथा आहेत. काही धर्मांमध्ये मृत्यूनंतर शरीराचं दफन करतात तर काही धर्मांत शरीराचं (body) दहन करतात.

  अखिल भारतीय आखाडा परिषदेचे (Akhil Bharatiya Akhada Parishad) अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Mahant Narendra Giri) यांच्यावर आज, 22 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. साधू किंवा संताचा मृत्यू होतो, तेव्हा त्यांच्या अंत्यसंस्कार (funerals) कसे केले जातात? हिंदू धर्मातल्या साधू-संतांवर अंत्यसंस्काराचे किती मार्ग आहेत? इतर धर्मात अंत्यसंस्कार कसे होतात? याबद्दलच्या काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

  संत परंपरेत त्यांच्या पंथानुसार अंतिम संस्कार केले जातात. वैष्णव संतांवर प्रामुख्याने अग्निसंस्कार केले जातात; मात्र संन्यासी परंपरेतल्या संतांवर अंत्यसंस्कार तीन प्रकारे केले जातात. त्यामध्ये वैदिक पद्धतीने केले जाणारे अंत्यसंस्कार हा एक प्रकार आहे. याशिवाय जलसमाधी आणि भूमीसमाधी हेदेखील प्रकार आहेत. अनेक वेळा संन्याशाच्या शेवटच्या इच्छेनुसार त्याचा मृतदेह जंगलात सोडण्याचीही पद्धत आहे.

  आयुष्याच्या सरत्या शेवटी, पुन्हा बांधली लग्नाची गाठ; 75 वर्षांच्या आजोबाचं लग्न

  वृंदावनचे मुख्य संत देवरहा बाबांना जलसमाधी देण्यात आली. आणखीही अनेक संतांवर अंत्यसंस्कार याच पद्धतीने झाले. बाबा जयगुरूदेव यांच्यावर अग्निसंस्काराद्वारे अंत्यसंस्कार करण्यात आले; मात्र यावरून वादही झाला. बाबांच्या इच्छेनुसार त्यांच्यावर वैदिक पद्धतीने अंत्यसंस्कार केले जात असल्याचं जयगुरूदेव आश्रमातल्या प्रमुख अनुयायांनी सांगितलं. रामायण, महाभारत आणि इतर हिंदू पौराणिक ग्रंथांमध्ये संतांना जलसमाधी देण्याचा उल्लेख आहे.

  संन्यासी परंपरेत जलसमाधी आणि भूमीसमाधी देण्याची प्रथा आहे; मात्र वैष्णवांमध्ये याआधी अनेक मोठ्या संतांवर अग्निसंस्कार केले गेले आहेत. साधूंना पूर्वी जलसमाधी दिली जात असे; मात्र यामुळे नदीप्रदूषण होण्याच्या मुद्द्यामुळे आता भूमीसमाधी दिली जाते. प्रयागराजमध्ये महंत नरेंद्र गिरी यांची पूजा केल्यानंतर त्यांच्या गुरूंच्या समाधीच्या शेजारीच त्यांनाही भू-समाधी दिली जाईल.

  भू-समाधीमध्ये साधूंना समाधीच्या स्थितीत बसवून निरोप दिला जातो. ज्या आसनात ते बसलेले असतात त्याला सिद्ध योगाची मुद्रा असं म्हणतात. महंत नरेंद्र गिरी यांनाही अशाच प्रकारे समाधी दिली जाईल.

  Good News: PMC बँकेसह राज्यातल्या 11 बँकांत अडकलेल्या ठेवी ग्राहकांना परत मिळणार

  अघोरी साधू जिवंत असतानाच आपल्यावर अंत्यसंस्कार करतात. साधू बनण्याच्या प्रक्रियेत अघोरींना प्रथम स्वतःचे अंत्यसंस्कार करावे लागतात. अघोरी कुटुंबापासून पूर्णपणे दूर राहून पूर्ण ब्रह्मचार्य पाळतात आणि यावेळी ते आपल्या कुटुंबाचा त्याग करण्याची प्रतिज्ञा करतात. अंत्यसंस्कारानंतर ते त्यांच्या कुटुंबासाठी आणि उर्वरित जगासाठीही जणू मृतच असतात.

  मुस्लिम धर्मातल्या धार्मिक व्यक्तीचा मृतदेह झोपून दफन केला जातो. ख्रिश्चन धर्मात पाद्री, बिशप आणि इतर धार्मिक व्यक्तींच्या मृतदेहाची आधी मिरवणूक काढतात. त्यानंतर त्यांचं दफन केलं जातं. पारशी धर्मात धाार्मिक गुरूचा मृतदेह त्यांच्या धर्मातल्या प्रथेप्रमाणे एका विशेष छतावर उघडा ठेवला जातो. या ठिकाणी गिधाडं आणि गरूड त्यांचं शरीर खातात.

  First published:
  top videos