Home /News /videsh /

कोरोनाच्या संकटकाळात याठिकाणी 600 टक्क्यांनी वाढली सायकलची मागणी, वाचा काय आहे कारण

कोरोनाच्या संकटकाळात याठिकाणी 600 टक्क्यांनी वाढली सायकलची मागणी, वाचा काय आहे कारण

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी अमेरिकेमध्ये सामान्य नागरिक सार्वजनिक वाहनांचा वापर करणं टाळत आहेत. सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याऐवजी त्यांनी सायकलचा पर्याय अवलंबला आहे.

    युनायटेड स्टेट्स, 22 मे : चीनच्या वुहानमधून सुरू झालेल्या कोरोना (Coronavirus)ने जगभरात थैमान घातले आहे. जगभरातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेकजण घराबाहेर पडण्याची आशा करत आहे. भारतात देखील 25 मार्चपासून लॉकडाऊन सुरू आहे. इतर देशांमध्ये देखील अनेक व्यवहार जवळपास बंद आहेत. दरम्यान अमेरिकेमध्ये सामान्य नागरिक सार्वजनिक वाहनांचा वापर करणं टाळत आहेत. सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याऐवजी त्यांनी सायकलचा पर्याय अवलंबला आहे. त्यामुळे सायकलची खरेदी अमेरिकेमध्ये वाढली आहे. सध्या अमेरिकेत भीतीचे वातावरण आहे. कोरोना संक्रमणापासून वाचणे हे लक्ष्य सर्व नागरिकांसमोर आहे. अमेरिकेमध्ये सायकलची मागणी इतकी वाढली आहे की, ज्या दुकानांमध्ये कायम पुरवठा असायचा त्याठिकाणी सायकल मिळणं कठीण होऊन बसलं आहे. मागणीबरोबर पुरवठा न वाढल्यामुळे सायकल्सची कमतरता भासू लागली आहे. (हे वाचा-निसर्गाने बदलला रंग; अंटार्क्टिकातील डोंगरावरील पांढऱ्या बर्फाचा रंग हिरवा झाला) हे असेच चालू राहिल्यास सायकल्सच्या ग्लोबल सप्लाय चेनवर देखील परिणाम होऊ शकतो. सायकलची मागणी अचानक वाढण्याचे कारण सार्वजनिक ठिकाणी स्वत:ला कोरोनापासून वाचवणे हे तर आहेत, पण याकाळात स्वत:ला तंदुरूस्त ठेवणे हे देखील आहे. कारण अमेरिकेमध्ये कोरोनाने सर्वाधिक थैमान घातले आहे. त्यामुळे याठिकाणचे नागरिक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी नक्कीच प्रयत्नशील आहेत. गर्दीतून प्रवास टाळण्यासाठी सायकलच्या पर्यायकडे पाहिले जात आहे. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे. (हे वाचा-4 दिवस काम तर 3 दिवस फिरा!पर्यटन वाढवण्यासाठी या देशाच्या पंतप्रधानांचा प्रस्ताव) अमेरिकन मीडियाच्या वृत्तांनुसार ब्रुकलिनमध्ये सायकल्सची विक्री 600 टक्क्यांनी वाढली आहे. अधिकतर दुकानांनी त्यांच्या इतरवेळच्या विक्रीपेक्षा तीन पट अधिक विक्री केली आहे. अद्यापही मागणी कमी झाली नसून, ग्राहकांची वेटिंग लिस्ट आहे. फिनिक्स, सिअॅटेलमध्ये देखील तिपटीने विक्री वाढली आहे. वॉशिंग्टन डीसीमधील एका दुकानदाराचे असे म्हणणे आहे ती, एप्रिलमध्येच दुकानातील सर्व सायकल्स विकल्या होत्या. मार्केट रिसर्च फर्म एनपीडी ग्रुप यांनी देखील या संदर्भात एक अहवाल दिला आहे. त्यानुसार मार्चमध्येच सायकलची मागणी वाढली. त्याचप्रमाणे त्यासाठी लागणारे इतर इक्विपमेंट आणि रिपेरिंगसाठी लागणारी साधने यामध्येही वाढ झाली आहे. (हे वाचा-Lockdown चा फायदा, काही तासांसाठी उघडलं सलून अन् लखपती झाली हेअर स्टायलिस्ट) ब्रिटन आणि फ्रान्समध्ये देखील सायकलची विक्री वाढली आहे. गर्दी कमी करण्यासाठी रस्ते बंद असल्यामुळे लोकांकडून सायकल किंंवा पायी जाण्याशिवाय पर्याय देखील नाही आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या