जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / आठवड्यातील 4 दिवस काम आणि 3 दिवस फिरा! पर्यटन वाढवण्यासाठी या देशाच्या पंतप्रधानांचा प्रस्ताव

आठवड्यातील 4 दिवस काम आणि 3 दिवस फिरा! पर्यटन वाढवण्यासाठी या देशाच्या पंतप्रधानांचा प्रस्ताव

आठवड्यातील 4 दिवस काम आणि 3 दिवस फिरा! पर्यटन वाढवण्यासाठी या देशाच्या पंतप्रधानांचा प्रस्ताव

सर्वच देशाच्या अर्थव्यवस्थांनी कोरोनापुढे हात टेकायला सुरूवात केली आहे. दरम्यान यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे काम व आयुष्यात संतुलन राखण्यासाठी एक प्रस्ताव दिला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

रोटोरुआ, 21 मे : जगभरात कोरोना व्हायरस (Coronavirus)चे थैमान सुरू आहे. सर्वच देशाच्या अर्थव्यवस्थांनी कोरोनापुढे हात टेकायला सुरूवात केली आहे. दरम्यान प्रत्येक देश त्यांची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. अशावेळी न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅकिंडा अर्डर्न (Jacinda Ardern) पर्यटन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे काम व आयुष्यात संतुलन राखण्यासाठी एक प्रस्ताव दिला आहे. त्यांनी आठवड्याचे 4 दिवस काम अशी पद्धत सुरू करण्याचे सुचवले आहे. पंतप्रधानांनी असे म्हटले की, त्यामुळे उरलेल्या तीन दिवसात नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडतील आणि त्यामुळे पर्यटन व्यवसाय वृद्धिंगत होईल. फेसबुक लाइव्हमध्ये पंतप्रधान जॅकिंडा अर्डर्न यांनी नागरिकांना असे सांंगितले की, अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यात येईल (हे वाचा- विमानप्रवास करताना मिळणार नाही या सेवा!करावं लागणार 7 महत्त्वाच्या नियमांचे पालन ) त्या म्हणल्या की याकरता लोकांना फिरण्यासाठी सुट्टी मिळणे आवश्यक आहे. जोपर्यंत विदेशी नागरिकांना देशात येण्यास निर्बंध आहेत, तोपर्यंत देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. अशावेळी देशातील नागरिकांनी अधिक वेळ फिरण्यासाठी कुटुंबाबरोबर घालवला पाहिजे. लॉकडाऊनमुळे पर्यटन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. अर्डर्न म्हणाल्या की, ‘आपण कोव्हिड 19 मुळे खूप काही शिकलो आहोत. घरातून काम करण्याची सवय हा आपल्या जीवनामध्ये झालेला सगळ्यात मोठा बदल आहे. मला अनेकांनी असं सुचवलं आहे की, 4 दिवस काम करणं निश्चित होणं आवश्यक आहे. ही कंपनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमधील बाब आहे. मात्र मी असं म्हणेन की जर एखादी कंपनी असं करू शकते तर यावर विचार केला जाऊ शकतो. ’ (हे वाचा- Lockdown चा फायदा, काही तासांसाठी उघडलं सलून अन् लखपती झाली हेअर स्टायलिस्ट ) त्या म्हणाल्या की जर 4 दिवस काम करण्यात आले तर उरलेल्या तीन दिवसात लोकं फिरण्यासाठी जाऊ शकतात. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी त्यांनी हा प्रस्ताव दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात