अंटार्क्टिका (Antarctica) म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो पांढऱ्याशुभ्र बर्फाची (white snow) चादर ओढलेला डोंगर. हिरवागार नटलेल्या डोंगराप्रमाणे या बर्फाच्छादित डोंगरांचं सौंदर्य काही औरच आहे. मात्र आता याच बर्फाच्या डोंगराचा रंग आता बदलू लागला आहे. हे पांढरेशुभ्र डोंगर हिरवेगार होऊ लागलेत. आता तुम्ही म्हणाल की मग ही चांगली बाब आहे. तर नाही या डोंगरावरील डोंगरांवरील बर्फाचा रंग बदलतो आहे. बर्फाचा पांढरा रंग आता हिरवा (green snow) होऊ लागला आहे आणि याबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
हवामान बदलामुळे बर्फाचा पांढरा रंग हिरवा होतो आहे. पर्यावरणातील बदलामुळे असं होत असल्याचं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. बदलत्या वेळेसह निसर्गानंही आपला रंग बदलणं सुरू केलं आहे. बुधवारी याबाबत एक रिपोर्ट छापण्यात आला आहे. हा बदल अंतराळातूनही दिसू शकतं.
ब्रिटिश संशोधक अर्नेस्ट शॅकेलटन यांनी याबाबत माहिती दिली आहे. युरोपियन स्पेस एजन्सीने सेंटिनल 2 सॅटेलाइटमार्फत 2 वर्षांचा डाटा जमा केला आहे. यामध्ये अंटार्क्टिकाचं विश्लेषण करण्यात आलं आहे. युनिव्हर्सिटी ऑफ कँब्रिज आणि ब्रिटिश अंटार्क्टिका सर्व्हेनं एकत्रितरित्या एक मॅप तयार केला आहे. या मॅपवर शेवाळ वेगानं वाढत असल्याचं समजतं आहे.
तज्ज्ञांच्या मते, पांढऱ्या रंगाचे बर्फाचे डोंगर हिरवे होत आहेत, हे शेवाळामुळे होऊ शकतं. अंटार्क्टिकामध्ये भरपूर कालावधीपासून शेवाळ आहे. या शेवाळाचं प्रमाण वाढून बर्फाचा रंग हिरवा होऊ लागला आहे. शेवाळची विशेषत: अशी असते की ते वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. शास्त्रज्ञ सांगतात याचा अर्थ या क्षेत्रात कार्बन उत्सर्जन वाढेल. याच क्षेत्रात यूकेत पेट्रोलवर चालणाऱ्या कारमुळे कार्बन उत्सर्जन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे.
रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार वैज्ञानिकांनी सांगितलं की, हे शेवाळ कुठून वाढत आहे आणि भविष्यात ते किती वाढतील हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. संशोधक फक्त हिरव्याच नाही तर लाल आणि नारंगी रंगाच्या शेवाळावरही रिसर्च करत आहेत. मात्र हे शेवाळ अद्याप स्पेसमधून दिसले नाहीत.
संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Snow