न्यूयॉर्क, 21 मे : जगभरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जगभरात 49 लाख 68 हजार 689 कोरोनाबिधात रुग्ण आहेत. तर, 3 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं जगातील जवळजवळ सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत आवश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर काही देशांमध्ये आता लॉकडाऊन सौम्य करून सलूनही सुरू करण्यात आले आहे. अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी, इथं काही सेवांवर सूट देण्यात आली आहे.
अमेरिकेत सलून सुरू केल्यानंतर मात्र एका हेअरस्टाइलिस्टची चांदी झाली. अवघ्या काही तासात ती लखपती झाली. अमेरिकेतील कोलोराडो राज्यांत लॉकडाऊनमध्ये सलून सेवा सुरू करण्यात आली. त्यामुळं तब्बल 2 महिन्यांनंतर घराबाहेर पडत सलून बाहेर महिला आणि पुरुषांनी मोठी गर्दी केली. अशातच एका सलूनची मालकिन इलिसिया नोव्होटनीनं मात्र अवघ्या काही तासांत लाखो कमवले.
वाचा-कंबर दुखायला लागली म्हणून झाला अॅडमिट, CT Scan रिपोर्ट पाहून डॉक्टर हैराण
लॉकडाऊनमध्ये इलिसियाकडे केस कापण्यासाठी एक तरुण आला आणि केस कापल्यानंतर त्यानं अडीच हजार डॉलरची टीप तिला दिली, म्हणजेच भारतीय रुपयानुसार तिला 1 लाख 89 हजारांची टीप मिळाली. नोव्होटनीनं सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून ती दुकान उघडण्याची वाट पाहच होती. सलून उघडल्यानंतर एका ग्राहकानं तिला दिलेली 1 लाख रुपयांची टीप पाहून काही वेळ तिलाही विश्वास बसला नाही.
वाचा-सासूनं गरम चपाती वाढली नाही म्हणून संतापला जावई, उचललं 'हे' भयंकर पाऊल
एवढेच नाही तर, या तरुणानं दुकानाच्या मॅनेजरला एक हजार डॉलर आणि रिसेप्शनिस्टलाही 500 डॉलर टीप दिली. लॉकडाऊनमध्ये जवळजवळ दोन महिने दुकान बंद असल्यानं नोव्होटनीकडे पैसेही नव्हते, त्यामुळं तिला पैशांची जास्त गरज होती. अशा परिस्थितीत या तरुणानं दिलेली टीप ही तिच्यासाठी फार महत्त्वाची होती. तिनं एक पोस्ट लिहित या व्यक्तीचे आभारही मानले.
वाचा-700 किमीचा पायी प्रवास करणाऱ्या मजुरांसाठी IPS अधिकारी झाली अन्नपूर्णा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.