मराठी बातम्या /बातम्या /विदेश /हसाल तर मराल! उत्तर कोरियात आता लोकांच्या हसण्यावरही बंदी; नियम मोडल्यास मृत्युदंड, 'हे' आहे कारण

हसाल तर मराल! उत्तर कोरियात आता लोकांच्या हसण्यावरही बंदी; नियम मोडल्यास मृत्युदंड, 'हे' आहे कारण

उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) हे नेहमीच आपल्या जनतेसाठी काहीतरी अजब आणि क्रूर असे आदेश काढत असतात. असाच एक आदेश आता लोकांचा आनंद हिरावून घेणार आहे.

उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) हे नेहमीच आपल्या जनतेसाठी काहीतरी अजब आणि क्रूर असे आदेश काढत असतात. असाच एक आदेश आता लोकांचा आनंद हिरावून घेणार आहे.

उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) हे नेहमीच आपल्या जनतेसाठी काहीतरी अजब आणि क्रूर असे आदेश काढत असतात. असाच एक आदेश आता लोकांचा आनंद हिरावून घेणार आहे.

  प्योंगयांग, 17 डिसेंबर : आपल्या चित्रविचित्र नियमांसाठी उत्तर कोरिया (North Korea) जगभरात ओळखला जातो. देशाचे हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) हे नेहमीच आपल्या जनतेसाठी काहीतरी अजब आणि क्रूर असे आदेश काढत असतात. आता या देशामध्ये चक्क लोकांच्या हसण्यावरही बंदी (Laughing banned in North Korea) घालण्यात आली आहे. या आदेशानुसार, एखादी व्यक्ती आनंद साजरा करण्यासाठी दारू पितानाही आढळली तरी तिला मृत्युदंड (Those found drinking will be hanged) देण्यात येणार आहे.

  उत्तर कोरियामध्ये देशाचे माजी हुकूमशाह किम जोंग इल (Kim Jong Il) यांची दहावी पुण्यतिशी साजरी करण्यात येत आहे. यासाठी 11 दिवस संपूर्ण देशात दुखवटा (Death anniversary of Kim Jong Il) पाळण्यात येणार आहे. यामुळे या कालावधीत सर्व नागरिकांच्या हसण्यावर आणि खूश राहण्यावर बंदी लागू करण्यात आली आहे. लोक या दुखवट्यादरम्यान पुरेसे दुःखी आहेत की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.

  डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, किम जोंग इल (Former Supreme leader of North Korea) हे 1994 ते 2011 या कालावधीत उत्तर कोरियाचे हुकूमशहा होते. 17 डिसेंबर 2011 ला त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. यानंतर त्यांचा तिसऱ्या क्रमांकाचा, सर्वात लहान मुलगा किम जोंग उन देशाचा नवा हुकूमशाह झाला. यावर्षी इल यांच्या निधनाला दहा वर्षे (10th death anniversary on Kim Jong Il) पूर्ण होत आहेत. यामुळे संपूर्ण देशावर 11 दिवसांचा दुखवटा पाळण्याची सक्ती करण्यात आली आहे.

  विचित्र! घरी पार्टीला बोलावलं आणि जेवण झाल्यावर मागितले पैसे

  सिनुइझ शहरातील एका नागरिकाने ‘रेडिओ फ्री एशिया’ला सांगितले, की त्यांना या काळात कोणत्याही प्रकारचा आनंद साजरा करण्यावर बंदी (Being happy banned in Korea) घालण्यात आली आहे. या काळात ना कोणी दारू पिऊ शकतो, ना हसू शकतो. एवढंच नाही, तर लोकांना त्यांचे वाढदिवस साजरे करण्यासही बंदी आहे.

  17 डिसेंबरला विकत घेता येणार नाही नव्या वस्तू

  किम जोंग इल यांची पुण्यतिथी असल्यामुळे 17 डिसेंबर रोजी देशातील कोणतीही व्यक्ती काहीही नवीन वस्तू विकत घेणार नाही असे जाहीर करण्यात आले आहे. यासोबतच घरामध्येही कोणी नवीन चांगली अशी डिश बनवणार नाही. या दिवशी सर्वांनी साधेच जेवण बनवायचे आहे, असा आदेशही देण्यात आला आहे. या नियमांचे उल्लंघन करताना कोणी आढळून आल्यास त्या व्यक्तीला कठोर शिक्षा देण्यात येणार आहे.

  पाकिस्तानच्या या हिंदू क्रिकेटरला धर्मामुळे सहन करावा लागला होता अपमान

  कोणी मेलं तर घरातच ठेवा

  या 11 दिवसांच्या दुखवट्यादरम्यान एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबातील इतरांना मोठ्याने रडण्याचीही परवानगी नाही. तसेच, मृतदेह देखील हा दुखवटा संपल्यानंतरच बाहेर नेता येणार आहे.

  उत्तर कोरियातील लोकांवर आधीपासूनच मोठ्या प्रमाणात निर्बंध लादण्यात आले होते. देशातील अन्नटंचाईमुळे किम जोंग उनने लोकांना कमी खाण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मनोरंजानाच्या गोष्टींवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या सगळ्यातच आता लोकांच्या हसण्यावरही बंदी आली आहे. त्या नागरिकांचं कसं होणार हे देवजाणे.

  First published:
  top videos

   Tags: Kim jong un, North korea, Strict laws