मराठी बातम्या /बातम्या /Viral /

विचित्र! घरी पार्टीला बोलावलं आणि जेवण झाल्यावर मागितले पैसे

विचित्र! घरी पार्टीला बोलावलं आणि जेवण झाल्यावर मागितले पैसे

तुम्हाला जर कुणी पार्टीला बोलावलं आणि जेवण झाल्यावर त्याचे पैसे मागितले, तर काय वाटेल? असा अनुभव नुकताच एका महिलेला आला.

तुम्हाला जर कुणी पार्टीला बोलावलं आणि जेवण झाल्यावर त्याचे पैसे मागितले, तर काय वाटेल? असा अनुभव नुकताच एका महिलेला आला.

तुम्हाला जर कुणी पार्टीला बोलावलं आणि जेवण झाल्यावर त्याचे पैसे मागितले, तर काय वाटेल? असा अनुभव नुकताच एका महिलेला आला.

  • Published by:  desk news

लंडन, 16 डिसेंबर: अगोदर मोठ्या आग्रहानं आपल्याला पार्टीसाठी (Party) घरी बोलावलं (Invited) आणि जेवण (Dinner) झाल्यावर त्याचे पैसे (Demanded money) मागितले, असा अनुभव एका महिलेनं शेअर केला आहे. भारतात पाहुण्यांना (Guests) परमेश्वर मानलं जातं. आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर त्यांचं पूर्ण क्षमतेनं आदरातिथ्य करण्याची परंपरा आहे. त्यांना घरातील सर्वोत्तम असेल, ते दिलं जातं आणि त्यांना काय हवं नको ते पाहिलं जातं. त्यांच्या आवडीनिवडीची काळजी घेतली जाते आणि पाहुण्यांचा मूड ठिक राहिल, याचीदेखील सतत काळजी घेतली जाते. मात्र लंडनमध्ये राहणाऱ्या एका महिलेला अजब पाहुणचाराचा नुकताच अनुभव आला.

पार्टीसाठी दिलं आमंत्रण

काही दिवसांपूर्वी एका ब्रिटीश महिलेनं तिच्या घरी पाहुणे आणि मित्रांना बोलावून पार्टी दिली होती. या पार्टीला आलेल्या एका महिलेनं नुकतीच एक पार्टी आयोजित केली होती आणि या महिलेलाही त्यासाठी आमंत्रित केलं होतं. मोठ्या आनंदानं ही महिला पार्टीला गेली. तिथं काही तास गप्पागोष्टी आणि ड्रिंक्स एंजॉय केल्यानंतर सर्वांनी एकत्र भोजन केलं. मात्र भोजन केल्यानंतर यजमान महिलेची मागणी ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.

महिलेनं मागितले पैसे

आपल्याला या पार्टीच्या आय़ोजनासाठी किती खर्च आला, याचे तपशील सादर करत महिलेनं प्रत्येक नातेवाईकाकडं पैसे मागितले. प्रत्येकाने आपापल्या वाट्याचे पैसे द्यावेत आणि या पार्टीचा खर्च उचलावा, अशी मागणी तिने केली. या मागणीमुळे महिलेला आश्चर्य वाटलं आणि वाईटही वाटलं. या पार्टीचं कॉन्ट्रिब्युशन म्हणून प्रत्येकाकडे 45 युरो म्हणजेच साधारण 4700 रुपये मागण्यात आले.

हे वाचा-कोल्हापुरच्या लेकीची आकाशाला गवसणी, जगप्रसिद्ध कंपनीच्या CEO पदी वर्णी

महिलेनं व्यक्त केलं दुःख

जेव्हा आपण आपल्या घरी पार्टी आयोजित केली होती, तेव्हा कुणाकडूनही पैसे घेतले नव्हते. मात्र आता आपल्याकडून अशा प्रकारे पैसे मागणं हा औचित्यभंग असल्याचा दावा महिलेनं केला आहे. यापेक्षा अधिक पैसे तर आपण प्रवासावर खर्च केल्याचं या महिलेनं म्हटलं आहे. युजर्सनी यावर वेगवेगळी मतं व्यक्त केली आहेत. काहींनी अशा प्रकारे पैसे घेणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी पैसे घेणं योग्य असून ही रक्कम मात्र जास्त असल्याचा दावा केला आहे.

First published:

Tags: Bride, Money, Party, Woman