Home /News /videsh /

किम जोंग उन यांना झालंय तरी काय? अचानक वजन घटल्याने हुकूमशाह चर्चेत

किम जोंग उन यांना झालंय तरी काय? अचानक वजन घटल्याने हुकूमशाह चर्चेत

उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशाह किम जोंग उनचा (Kim Jong Un) नवा फोटो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत.

प्योंगयांग, 28 जून : जगभरात जर तुम्ही निरोगी राहण्यासाठी वजन कमी (Weight Loss) केले तर सहसा लोक तुमची प्रशंसा करतात आणि तुमच्याकडे या परिवर्तनाबाबत विचारणा करतात. पण हिच बाब सध्या उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्याबाबत घडल्याने संपूर्ण देश काळजीत पडला आहे. सध्या किम त्यांच्या घटलेल्या वजनामुळे चर्चेत आहेत. किम यांनी आपलं वजन मोठ्या प्रमाणात कमी केल्याचे अलिकडेच उत्तर कोरिया सरकारने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रावरून दिसून येते. त्यांच्या फॅन्सी घड्याळ्याचा पट्टा अधिक घट्ट झाल्याचं आणि त्याच्या चेहऱ्यावरून ते बारीक झाल्याचं या फोटोत दिसतं आहे. काही निरीक्षकांच्या मते, किमची उंची 170 सेंटिमीटर म्हणजे 5 फूट 8 इंच आहे. यापूर्वी त्याच वजन 140 किलोग्रॅम म्हणजेच 308 पौंड होतं. आता त्यानी 10 ते 20 किलोग्रॅम म्हणजे 22 ते 44 पौंड वजन कमी केलं आहे. सेऊल येथील कोरिया इन्स्टिट्यूट फॉर नॅशनल युनिफिकेशनचे वरिष्ठ विश्लेषक हॉंग मीन यांच्या मते, किम यांनीआरोग्य सुधारण्यासाठी (Health Improvement) वजन कमी केलं आहे. ते आजारपणामुळे कमी झालेलं नाही. जर त्यांना आरोग्यविषयक त्रास होत असता तर त्यांनी राजकीयदृष्टया महत्वाच्या असणाऱ्या कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या या आठवड्यात 2 ते 3 दिवस होणाऱ्या बैठकीस उपस्थिती लावली नसती, असे हॉंग यांनी सांगितलं. अधिक प्रमाणात मद्य घेणारी (Drink) आणि स्मोकिंग (Smoking) करणारी व्यक्ती अशी किमची ओळख आहे. तसंच त्यांना हृदयविकाराची फॅमिली हिस्ट्री आहे. त्याच्यापूर्वी उत्तर कोरियावर राज्य करणारे त्याचे वडील आणि आजोबा यांचा मृत्यू हा हृदयविकाराने झालेला आहे. किमचे वजन अतिरिक्त वाढल्याने त्याला हृदयविकार (Heart Disease) जडण्याची शक्यता आहे, असं काही तज्ज्ञांनी सांगितलं. हे वाचा - सिक्स पॅक अ‍ॅब्ज नाही पोट सुटलेला नवरा हवा! अशा पुरुषासाठी इथं तरुणींच्या रांगा सेऊल, वॉशिंग्टन, टोकिओ तसंच जगातील अन्य देशांच्या दृष्टिने किमच्या प्रकृतीची माहिती मिळणं महत्वाचं आहे. कारण युनायटेड स्टेटस आणि मित्र राष्ट्रांना लक्ष्य करणाऱ्या अत्याधुनिक अण्वस्त्र कार्यक्रमांचा कंट्रोल किमच्या अनुपस्थित कोण सांभाळणार याची माहिती म्हणजेच थोडक्यात त्याचा राजकीय वारस कोण याबद्दल किमने कुठलीही जाहीर वाच्यता केलेली नाही. उत्तर कोरिया त्यांच्या नेतृत्वाविषयी तसेच अंतर्गत बाबींविषयी कोणतीही माहिती उघड करत नाही. गेल्या वर्षभरात कोरोनाव्हायरसच्या (Corona Virus) पार्श्वभूमीवर या बाब अधिकच कडक करण्यात आली आहे. किमचा स्लिमर लूक दक्षिण कोरियात उत्सुकतेचा विषय ठरला असून मीडीयाने त्यांचे यापूर्वीचे आणि सध्याचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. दक्षिण कोरियाच्या युनिफिकेशन मंत्रालयाने मात्र किमच्या आरोग्याबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे. केवळ इतर देशांनाच किमच्या आरोग्याची काळजी आहे असं नाही तर उत्तर कोरियातील प्रत्येकालाच चिंता वाटते आहे. किमचं व्हिडीओ फुटेज पाहिल्यानंतर प्योंगयांग येथील एका अज्ञात रहिवाशाने रॉयटर्सशी बोलताना सांगितले की किम जोंग उन यांचे वजन कमी झाल्याने उत्तर कोरियामधील प्रत्येकजण मनापासून दुःखी आहे. किम यांच्या आरोग्याबाबत क्वचितच जाहिर भाष्य करणाऱ्या परदेशी विश्लेषकांनी या जूनमध्ये या 37 वर्षीय निरंकुश नेत्याचे वजन लक्षणीय कमी झाल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. हे वाचा - मृत्यूचं तांडव पाहिलेले इटलीकर 'मास्क'मुक्त, एक तृतीयांश नागरिक Low Risk गटात आदरणीय सरचिटणीस किम जोंग उन यांना पाहून आपल्या लोकांचे हृदय पिळवटून निघालं असल्याचं शुक्रवारी उत्तर कोरियातील सरकारी ब्रॉडकास्टर केआरटीने (KRT) प्रसारित केलेल्या मुलाखतीत एका व्यक्तीने सांगितले. त्यांना पाहून प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात अश्रू येत असल्याचे त्या व्यक्तीने स्पष्ट केले. प्योंगयांगचे रहिवासी रस्त्यावरील मोठ्या स्क्रिनवर आपला नेता वर्कर्स पार्टी ऑफ कोरियाच्या बैठकीला अधिकाऱ्यांसह उपस्थित राहिला असताना त्याला पाहत असल्याचे या क्लिपमध्ये दिसते आहे. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला 15 एप्रिलला उत्तर कोरियातील हुकूमशाहीचे संस्थापक किम II सुंग यांच्या जयंती सोहळ्याला किम जोंग उन अनुपस्थित राहिला होता त्यामुळे त्याच्या तब्येतीबाबत वावड्या उठल्या होत्या. मात्र मे महिन्याच्या सुरुवातीला त्यांचे सार्वजनिक ठिकाणी दर्शन झाले होते. 2014 मध्ये जनमानसाच्या नजरेपासून दीर्घकाळ दूर राहिल्याने किमला अस्वस्थता वाटली होती असं देशातील मिडीया रिपोर्टमध्ये म्हटलं होतं.
First published:

Tags: Kim jong un, North korea, Weight, Weight loss

पुढील बातम्या