• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • सिक्स पॅक अ‍ॅब्ज नाही तर पोट सुटलेला नवरा हवा! अशा पुरुषासाठी इथं तरुणींच्या लागतात रांगा

सिक्स पॅक अ‍ॅब्ज नाही तर पोट सुटलेला नवरा हवा! अशा पुरुषासाठी इथं तरुणींच्या लागतात रांगा

इथं दरवर्षी लठ्ठ पुरुषाची (Fattest Man Competition) एक स्पर्धा होते. या स्पर्धेत जो जिंकतो, त्याला सर्वात हँडसम मानलं जातं.

 • Share this:
  अदिस अबाबा, 28 जून : हँडसम (Handsome), सिक्स पॅक अॅब्ज, ढोले-शोले असलेला तरुण कोणत्या मुलीला आवडणार नाही. बहुतेक तुरुणींच्या स्वप्नातील राजकुमार (Marriage Material Boys) असाच असतो. त्यांना असाच तरुण आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवा असतो. कमरेचा घेर वाढलेला, पोट सुटलेल्या तरुणाला तर कित्येक तरुणी भावही देत नाही. असंच किती तरी जणांना वाटतं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक असं ठिकाण आहे, जिथं सिक्स पॅक अॅब्ज नाही. तर पोट सुटलेल्या पुरुषांनाच हँडसम आणि हॉट (Fattest Man considered hottest and handsome) मानलं जातं आणि अशा मुलाशी लग्न करण्यासाठी तरुणींच्या अक्षरश: रांगा लागतात. इथोपियातील (Ethiopia) ओमो व्हॅलीत (Omo Valley) राहणारे बोदी आदिवासी. या आदिवासींमध्ये दरवर्षी लठ्ठ पुरुषांची (Fattest Man Competition)  एक स्पर्धा होते. या स्पर्धेत जो पुरुष जिंकतो, त्याला सर्वात हँडसम पुरुष मानलं जातं. मग या हँडसम पुरुषाशी लग्न करण्यासाठी तरुणींचीही भांडणं होतात. हे वाचा - केवळ अतिखाण्यानेच नव्हे तर जास्त पाणी पिण्याने आणि कमी खाण्यानेही वाढतं वजन तरुणींना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पुरुषांकडे ही एकमेव संधी असते. त्यामुळे ही स्पर्धा जिंकण्यासाठी इथले पुरुष सहा महिने आधीपासूनच तयारी सुरू करतात. जास्तीत जास्त लठ्ठ होण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात. त्यात सर्वात उत्तम पर्याय म्हणून गायीचं रक्त आणि दूध एकत्र करून ते पितात. यामुळे पोट आणि शरीराच्या इतर भागात लवकर चरबी साठते, असं मानलं जातं. यामुळे ते आजारी पडण्याचाही धोका असतो. पण याची कोणतीही भीती न बाळगता हँडसम आणि हॉट किताब आपल्याला मिळावा यासाठी बहुतेक पुरुष असं करतात. फक्त हाच त्यांचा आहार असतो. त्यापैकी काही पुरुष हे दूध पिऊ शकतात तर काहींना असं दूध पिताच उलटी होते. शिवाय हे पुरुष सहा महिने एका वेगळ्या झोपडीत राहतात. त्यांना सेक्स करण्याची परवानगी नसते. हे वाचा - Weight Loss कमी करण्याचा सोपा उपाय; फक्त सकाळच्या काही सवयी बदला 6 महिने झोपडीत राहून, गायीचं रक्त आणि दूध पिऊन हे पुरुष आपल्या वजनदार शरीरासह स्पर्धेसाठी सर्वांसमोर येतात. जो जितका लठ्ठ तितका हँडसम. त्याला मग हिरो म्हटलं जातं.
  Published by:Priya Lad
  First published: