• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • मृत्यूचं तांडव पाहिलेले इटलीकर झाले 'मास्क'मुक्त, एक तृतीयांश नागरिक आले Low Risk गटात

मृत्यूचं तांडव पाहिलेले इटलीकर झाले 'मास्क'मुक्त, एक तृतीयांश नागरिक आले Low Risk गटात

इटलीनं (Coronavirus Italy)12 वर्षांवरील एकूण लोकसंख्येपैकी एक तृतीयांश नागरिकांचं लसीकरण पूर्ण केल्यानंतर मास्क उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्ण देश आता ‘लो रिस्क’ झाला असून मास्कचं बंधन हटवण्यात आलं आहे.

 • Share this:
  रोम, 28 जून : इटलीनं (Italy) 12 वर्षांवरील एकूण लोकसंख्येपैकी एक तृतीयांश (One Third) नागरिकांचं लसीकरण (Vaccination) पूर्ण केल्यानंतर मास्क (Mask) उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्ण देश आता ‘लो रिस्क’ (Low Risk) झाला असून आपण मास्क न वापरता घराबाहेर पडायला हरकत नाही, असं इटली सरकारनं (Italy Government) नागरिकांना सांगितलं आहे. सोमवारपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून इटलीकर सध्या घराबाहेर मोकळा श्वास घेताना दिसत आहेत. गेल्या वर्षी कोरोनाचा सर्वाधिक उद्रेक इटलीमध्येच झाला होता. कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित झालेला युरोपातील देश अशी इटलीची ख्याती जगभर पसरली होती. मात्र या परिस्थितीवर मात करत इटलीने अत्यंत वेगाने मास्कमुक्तीपर्यंतचा पल्ला गाठला आहे. इटलीची सर्व विभाग आता धोक्याच्या पातळीबाहेर आले असून सर्वांना सुरक्षित दर्जा देण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कची गरज नाही इटलीतील नागरिकांना आता सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरण्याचं बंधन असणार नाही. काही नागरिकांना सुरक्षेसाठी मास्क वापरायचे असतील, तर ते वापरू शकतील. मात्र सरकारकडून मास्क वापरण्याची सक्ती मागे घेण्यात आली आहे. एक तृतीयांश जनतेचं लसीकरण इटलीत 12 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण हाती घेण्यात आलं आहे.

  मुंबईत 50% लहान मुलांना कोरोना झाला; BMC च्या रिपोर्टमध्ये समोर आली धक्कादायक बाब

   आतापर्यंत 1 कोटी 75 लाख 72 हजार 505 जणांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. आतापर्यंत इटलीत कोरोनामुळे 1 लाख 27 हजार जणांचा कोरोनामुळं मृत्यु झाला आहे. या भीषण परिस्थितीवर मात करत इटलीनं लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा पार करत हर्ड इम्युनिटीच्या दिशेनं पावलं टाकली आहेत.
  पर्यटन खुलं गेले दीड वर्षं बंद असलेलं पर्यटनही आता सुरु करण्यात आलं आहे. युरोप, ब्रिटन, अमेरिका, कॅनडा आणि जपानमधील नागरिकांना इटलीत येण्यास सरकारनं दरवाजे खुले केले आहेत. या पर्यटकांना आता केवळ लसीकरणाचं सर्टिफिकेट दाखवावं लागणार आहे. यापूर्वी असलेली क्वारंटाईन होण्याची अटदेखील काढून टाकण्यात आली आहे. पर्यटकांनी लस घेतलेली असणं आणि कोरोना चाचणी निगेटिव्ह येणं या दोन निकषांच्या आधारे त्यांना थेट देशात प्रवेश देण्यात येणार आहे.
  Published by:desk news
  First published: