मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनाच्या दहशतीत भारतीयांना दिलासा, इतर देशांच्या तुलनेत व्हायरस भारतात घेतोय कमी जीव

कोरोनाच्या दहशतीत भारतीयांना दिलासा, इतर देशांच्या तुलनेत व्हायरस भारतात घेतोय कमी जीव

News18.com ने कोरोनाव्हायरसचे हॉटस्पॉट (coronavirus hotspot) असलेल्या जगातील 34 मुख्य शहरांचा अभ्यास केला.

News18.com ने कोरोनाव्हायरसचे हॉटस्पॉट (coronavirus hotspot) असलेल्या जगातील 34 मुख्य शहरांचा अभ्यास केला.

News18.com ने कोरोनाव्हायरसचे हॉटस्पॉट (coronavirus hotspot) असलेल्या जगातील 34 मुख्य शहरांचा अभ्यास केला.

  • Published by:  Priya Lad
नवी दिल्ली, 26 एप्रिल : भारतात आतापर्यंत कोरोनाव्हायरसची (Coronavirus) एकूण 26496  प्रकरणं आहेत. तर 824  रुग्णांचा या व्हायरसने बळी घेतला आहे. कोरोनाच्या दहशतीत भारतीयांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे कोरोनाव्हायरसच्या जागतिक हॉटस्पॉटच्या तुलनेत भारतातील मुख्य शहरात कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी आहे. News18.com ने कोरोनाव्हायरसचे हॉटस्पॉट असलेल्या जगातील 34 मुख्य शहरांचा अभ्यास केला. युरोप आणि अमेरिकेतील शहरांच्या तुलनेत भारतातील मुख्य शहरांमधील मृत्यूदर कमी असल्याचं दिसून आलं. भारतातील मुख्य शहरांमधील मृत्यूदर दिल्ली 2.10%, मुंबई 3.97%, अहमदाबाद 4.18%, इंदोर 5.61%, पुणे 6.40% इतर देशांमधील मुख्य शहरातील मृत्यूदर पॅरिस 6.73%, न्यूयॉर्क 7.26%, वुहान 7.69%, माद्रिद 12.70%, लंडन 18.89% भारतातील शहराचा जगातील इतर देशांतील शहराशी तुलना करता भारताची परिस्थिती खूपच चांगली आहे. हे वाचा - दूरूनच चेहरा पाहून होणार कोरोनाची तपासणी, शास्त्रज्ञांनी तयार केलं उपकरण कोरोनाव्हायरसमुळे होणारा मृत्यूदर कमी असलेल्या या शहरांच्या यादीत दिल्ली चौथ्या स्थानावर आहे. दिल्लीत मृत्यूदर 2.10 टक्के आहे. सिंगापूरमध्ये सर्वात कमी म्हणजे 0.10 टक्के प्रमाण आहे, त्यानंतर मॉस्को 0.88 आणि बर्लिनमध्ये 2.05 प्रमाण आहे. निजामुद्दीन मरकजनंतर दिल्लीमध्ये कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली. मात्र तरीही मृत्यूची संख्या नियंत्रणात ठेवण्यात दिल्ली यशस्वी ठरली. भारतातील मृत्यूच्या प्रमाणात आश्चर्यकारक घट जगभरात कोरोनाव्हायरसमुळे मृत्यूचा आकडा वाढतो आहे. मात्र भारतात उलट परिस्थिती आहेत. भारतात सामान्य दिवसांच्या तुलनेत लॉकडाऊनच्यादिवसात मृत्यूच्या (death) आकडेवारीत लक्षणीय घट झाली आहे. भारतातल्या काही ठिकाणी मृत्यूदर कमी झाला आहे. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिलं आहे. भारतात मृत्यूदर कमी का असावा, यामागे विविध कारणं असावीत असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. रस्ते, रेल्वे अपघात, स्ट्रोक, हार्ट अटॅक, हत्या अशी प्रकरणं नसल्याने त्याचा परिणाम मृत्यूदरावर झाला असावा अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड हे वाचा - भारतात कोरोनाव्हायरसचा कहर; मात्र मृत्यूच्या आकडेवारीत आश्चर्यकारक घट
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या