प्याँगयांग, 25 एप्रिल : उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या प्रकृतीबाबत अजूनही रहस्य कायम आहे. रोज त्यांच्या प्रकृतीबाबत विविध बातम्या येत असतात. आता किम जोंग यांच्यासाठी चीनने आपल्या सर्वोत्तम डॉक्टरांची टीम उत्तर कोरियाला पाठवली असल्याच्या बातम्या येत आहेत. याआधी अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी किम यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगितले होते, त्यानंतर दक्षिण कोरियातील सरकारी सूत्रांनी ही बातमी खोटी असल्याची माहिती दिली. मात्र अद्याप किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
मेडिकल सल्ला देण्यासाठी पाठवण्यात आली टीम
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात, चीनने उत्तर कोरियात आपली एक मेडिकल तज्ज्ञांची टीम पाठवली आहे. ही टीम किम जोंग यांच्या आरोग्याबाबत माहिती घेण्यासाठी आणि त्यांना आवश्यक सल्ले देण्यासाठी पाठवण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार कम्युनिस्ट पार्टीच्या आंतरराष्ट्रीय लायजन विभागाच्या एका सदस्याच्या नेतृत्वाखाली ही टीम प्याँगयांगमध्ये दाखल झाली आहे.
वाचा-किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत सस्पेन्स कायम, 6 वर्ष अशी सुरू होती सर्जरीची तयारी
किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत सस्पेन्स कायम
याआधी दक्षिण कोरियाच्या एका सुत्रांनी किम जोंग यांची प्रकृती ठीक असून, लवकरच ते लोकांसमोर येतील, असे सांगितले होते. मात्र सीएनएनच्या म्हणण्यानुसार किम जोंग यांनी 4 दिवसांआधी एक बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी देशाच्या मुख्य मंत्रिमंडळातही अनेक मोठे बदल केले. 2011पासून उत्तर कोरियामध्ये किम सत्तेवर आल्यापासून, त्यांनी एकही कामाचा दिवस चुकवला नाही आहे. दरम्यान,अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या एका छायाचित्रात उत्तर कोरियाचे वरिष्ठ अधिकारी कुमुसनमधील पॅलेस ऑफ सन येथे किम इल सुंग यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत, असा दावा केला आहे.
वाचा-किम जोंग उन यांची 3 मुलं जगासाठी एक रहस्य, बहीण होऊ शकते उत्तराधिकारी
अत्यंत खास रुग्णालयात झाली शस्त्रक्रिया
उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमधील रुग्णालयात किमवर उपचार का केले नाहीत, असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. ह्यंग सॅन येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. एनके डेली या वेबसाइटनुसार, किम यांच्यावर शस्त्रक्रिया करणार्या ह्यंग सॅनमधील डॉक्टरांची नेमणुक केवळ किम यांच्या कुटुंबावर उपचार करण्यासाठी करण्यात आली होती. 2014मध्ये किमची यांची प्रकृती नाजूक होती, तेव्हा सुद्धा याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले होते. 1994 मध्ये किमचे आजोबा किम इल सुंग यांच्या निधनानंतर हे रुग्णालय बांधले गेले. जगातील इतर कोणत्याही देशाला याबाबत कळू नये म्हणून हे हॉस्पिटल हॉंग सॅनमध्ये बांधले गेले.
वाचा-किम जोंग उन यांना नेमकं झालं काय? Grave Danger चा काय आहे अर्थ?
संपादन, संकलन-प्रियांका गावडे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kim jong un