Home /News /videsh /

किम जोंग उनला वाटते कोरोनाची भीती, हुकूमशहाच्या बैठकीची Inside Story बाहेर!

किम जोंग उनला वाटते कोरोनाची भीती, हुकूमशहाच्या बैठकीची Inside Story बाहेर!

उत्तर कोरियाची मोठी सीमा चीनला लागून आहे. त्यामुळे उत्तर कोरियातही कोरोनाने शिरकाव केला असावा मात्र त्याबद्दल माहिती बाहेर येऊ दिली जात नाही असं बोललं जात आहे.

    गयाँग 8 जून: जगातल्या 190 देशांमध्ये कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. मात्र उत्तर कोरिया हा अजुन कोरोनामुक्त असल्याचा दावा केला जात आहे. आता या दाव्यावरच प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. हुकूमशहा किम जोंग उनच्या एका बैठकीची माहिती आणि फोटो बाहेर आला असून आता त्याविषयी शंका उपस्थित केली जात आहे. किम उन याला कोरोनाची भीती वाटत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. किम जोंग याने नुकतीच सत्तारुढ पक्षाच्या पॉलिट ब्युरोची एक बैठक घेतली होती. त्या बैठकीचं वृत्त सरकारी KCNA या वाहिनीने दिलं. त्यासोबतच काही फोटोही प्रसिद्ध केलेत. त्यानंतर या चर्चेला जगभर सुरूवात झाली आहे. या बैठकीत किम जोंग हा वेगळा बसलेला दिसत आहे. त्याचबरोबर इतर लष्करी आणि मुलकी अधिकारी हे त्याच्यापासून काही अंतरावर बसलेले दिसत आहेत. त्यामुळे उत्तर कोरियातही कोरोनाने शिरकाव केला अशी शंका उपस्थित केली जाते. याधी किम जोंग यांच्या प्रकृती विषयी अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्याच्या मृत्यू झाला अशीही अफवा पसरली होती. कारण किम अनेक दिवस कुणालाच दिसला नव्हता. त्यानंतर तो कार्यक्रमांमध्ये दिसू लागला. किमला सध्या कोरोनाची सर्वात जास्त भीती वाटत असून तो जाणार असलेल्या ठिकाणी खास काळजी घेतली जात आहे अशीही माहिती समोर आली आहे. हे वाचा -  जगभरात कोरोनाने घेतला लाखोंचा बळी; या 3 देशांमध्ये माजलाय हाहा:कार उत्तर कोरियाची मोठी सीमा चीनला लागून आहे. त्यामुळे उत्तर कोरियातही कोरोनाने शिरकाव केला असावा मात्र त्याबद्दल माहिती बाहेर येऊ दिली जात नाही असं बोललं जात आहे. हेही वाचा -  चीनचा अमेरिकेवर पलटवार, कोरोना पसरविल्याच्या आरोपांवर दिलं हे उत्तर! लशीशिवाय 'या' देशानं कोरोनाला हरवलं! तीन महिन्यात असा झाला कोरोनामुक्त
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Coronavirus, Kim jong un

    पुढील बातम्या