Home /News /videsh /

लशीशिवाय 'या' देशानं कोरोनाला हरवलं! तीन महिन्यात असा झाला कोरोनामुक्त

लशीशिवाय 'या' देशानं कोरोनाला हरवलं! तीन महिन्यात असा झाला कोरोनामुक्त

आतापर्यंत 67 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या सगळ्यात एक देश असा आहे, ज्यानं इतिहास रचत कोरोनावर मात करून दाखवली आहे.

    ऑकलंड, 08 जून : जगभरात कोरोना थैमान घालत आहे. आतापर्यंत 67 लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या सगळ्यात एक देश असा आहे, ज्यानं इतिहास रचत कोरोनावर मात करून दाखवली आहे. न्यूझीलंडनं आपल्या देशातील सीमा बंद करत तीन महिन्यांत कोरोनाला हरवून देश कोरोनामुक्त झाल्याचं जाहीर केलं. आता न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही आहे. देशभरात एखाद्या सणासारखं उत्साहाचं वातावरण आहे. आज पहाटे न्यूझीलंडनं अखेरचा कोरोना रुग्ण निरोगी झाल्याचं जाहीर केलं. गेल्या 17 दिवसांत देशात एकही नवीन रुग्ण आढळून आला नव्हता. न्यूझीलंडमधील निरोगी झालेल्या या रुग्णाचे वय 50 वर्षांहून अधिक होते. ऑकलंडमध्ये राहणाऱ्या या महिलेत 48 तासांत कोणतीही लक्षणं दिसून आली नाहीत. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पहाटे तीन वाजता पंतप्रधान जेसिंडा अर्डेने यांनी देशाला संबोधित करत ही माहिती दिली. जेसिंडा यावेळी देशातील लॉकडाऊन हटवण्याबाबत तसेच काही प्रमाणात सूट देण्याबाबत घोषणा केली आणि न्यूझीलंड कोरोनामुक्त झाल्याचं जाहीर केलं. वाचा-UNLOCK च्या पहिल्याच दिवशी 'मुंबई मेरी जाम', पाहा हे VIDEOS न्यूझीलंडचे डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ एशली ब्लूमफील्ड यांनी शेवटचा रुग्ण निरोगी झाल्यानंतर देशात एकही सक्रीय रुग्ण नसल्याचं जाहीर केलं. 28 फेब्रुवारीनंतर असं पहिल्यांदा घडलं आहे आणि ही उल्लेखनीय बाब आहे. असे असले तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. वाचा-एका फोटोग्राफरमुळं अख्खं शहर हादरलं, तब्बल 150 जणं निघाले कोरोना पॉझिटिव्ह मुख्य म्हणजे न्यूझीलंडची लोकसंख्या 49 लाखांच्या आसपास आहे. मात्र पहिल्यापासूनच त्यांनी कडक नियम लावले. न्यूझीलंडमध्ये 28 फेब्रुवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर एकूण1504 कोरोनार रुग्ण सापडले.यातील 22 जणांचा मृत्यू झाला. मात्र मार्चपासून देशातील सर्व सीमा बंद करण्यात आल्या. याशिवाय लॉकडाऊनच्या नियमांचेही काटेकोरपणे पालन करण्यात आले. वाचा-काही दिवसांत बदललं पुण्याचं चित्र, कोरोनाबाबत ही आहे POSITIVE NEWS
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या