बीजिंग 7 जून: चीननेच कोरोना व्हायरसचा प्रसार केला असा आरोप जगातल्या अनेक देशांनी केला आहे. यात सर्वात आघाडीवर आहे तो अमेरिका. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे अनेकदा चीनवर हा आरोप केला आहे. या आरोपांना चीन आणि अमेरिकेत असलेल्या व्यापार युद्धाचीही जोड आहे. या सगळ्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेवर पलटवार कर चीनने आज एक श्वेतपत्र प्रसिद्ध केलं. त्यात चीनवरचे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. अमेरिका आणि त्यांच्या काही मित्र देशांनी कोरोना प्रसाराचे आरोप केल्याने चीनची प्रतिमा जगात डागाळली होती. ती प्रतिमा उजळण्यासाठी चीनने ही श्वेतपत्रिका काढली आहे. 27 डिसेंबरला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि 19 जानेवारीला हा संसर्गजन्य आजार असल्याचं कळालं. त्यानंतर तातडीने उपाययोजना सुरू केल्याचं चीनने म्हटलं आहे. चीनने डब्ल्यूएचओला डेटा देण्यास दिला नकार WHOने काही दिवसांपूर्वीच चीनवरही नाराजी दर्शवली होत. चीन हा कोरोना संशोधनाचा डेटा शेअर करत नव्हता. एपीने आपल्या अहवालात हा दावा केला आहे. त्यात म्हटले आहे की डब्ल्यूएचओबरोबर डेटा शेअर करण्यास चीन टाळाटाळ करीत होता. त्याने कोरोनाशी संबंधित जेनेटिक नकाशा, जीनोमच्या संरचनेशी संबंधित काही महत्त्वाचे तथ्य अनेक आठवड्यांपर्यंत लपवून ठेवले होते. हे वाचा - ‘ड्रॅगन’चा नवा प्लॅन आला जगासमोर, असा रचला डाव! चीनने डब्ल्यूएचओकडून अनेक संशोधनाची माहिती लपवली आहे, असा संशय व्यक्त केला जात आहे. डब्ल्यूएचओ अधिकारी आणि चीनी आरोग्य मंत्रालय यांच्यात ईमेलच्या माध्यमातून डेटा सामायिक करण्याबद्दल बर्याच वेळा चर्चा झाली. डब्ल्यूएचओने मेलमध्ये लिहिलं आहे की, या चीनच्या अशा वागणुकीमुळे लसीच्या सुरुवातीलच्या संशोधनात विलंब झाला. हे वाचा - ' अबब! हँडपंपमधून निघालं 8 किलो सोनं, पोलिसही गेले चक्रावून WHO कार्यकारी संचालक माइक रिएन यांनी कोरोना कमकुवत झालेला नाही असे सांगून इटालियन डॉक्टरांचा दावा नाकारला आहे. इटलीचे अव्वल डॉक्टर अल्बर्टो जॅंगेरिलो म्हणाले होते की, त्याच्या देशात कोरोनाचे अस्तित्व वैद्यकीयदृष्ट्या संपले आहे. यावर डब्ल्यूएचओच्या एपिडेमिओलॉजिस्ट मारिया वॅन म्हणतात की, कोरोना बदलला आहे असे सांगण्यासाठी कोणताही पुरावा मिळालेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.