जगभरात कोरोनाने घेतला लाखोंचा बळी; या 3 देशांमध्ये माजलाय हाहा:कार

जगभरात कोरोनाने घेतला लाखोंचा बळी; या 3 देशांमध्ये माजलाय हाहा:कार

कोरोनाने जगभरात कहर केला आहे. यावर लस उपलब्ध नसल्याने नागरिकांनी सजग राहून स्वत:ची काळजी घेणं आवश्यक आहे

  • Share this:

ब्राझील, 7 जून : कोरोनाव्हायरसमुळे जगभरात संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या 70 लाखांच्या जवळपास पोहोचली आहे. त्याचबरोबर या साथीने मरण पावलेल्या लोकांची संख्या 4 लाखांच्या पुढे गेली आहे.

रविवारी सकाळपर्यंत जगभरात कोविड – 19 च्या एकूण 69 लाख 73 हजार 427 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी मृतांची संख्या 4 लाख 02 हजार 049 इतकी आहे. चांगली बाब म्हणजे या काळात 34 लाख 11 हजार 118 लोक बरे झाले आहेत.

कोरोना संक्रमणामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशात अमेरिकेत एकूण 1 लाख 12 हजार 096 लोकांचा मृत्यू झाला असून 19 लाख 88 हजार 544 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोविड – 19 संसर्गाच्या 6 लाख 75 हजार 830 रुग्णांसह ब्राजील दुसरा सर्वात प्रभावित झालेला देश आहे. तर रशियात 4 लाख 58 हजार 689 रुग्ण असून हा देश तिसऱ्या क्रमांकावर आहे.

213 देशात कोरोना हाहाकार

जगभरात 213 देशांमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. जगातील जवळपास 76 टक्के रुग्ण केवळ14 देशातील आहेत. या देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 52 लाखाहून जास्त आहे. ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटन, इटली, भारत येथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. याखेरीज असे सात देश आहेत ज्यात एक लाखाहून अधिक कोरोनाची रुग्ण आहेत. अमेरिकेसह या 14 देशांमध्ये एकूण 52 लाख प्रकरणे आहेत.

हे वाचा-मोठी बातमी! या तारखेपासून सुरू होणार देशातील शाळा आणि महाविद्यालये

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी सरजा यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

First published: June 7, 2020, 7:13 PM IST

ताज्या बातम्या