मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

किम जोंगचा उन्माद, पुन्हा मिसाईल टेस्ट; अमेरिकेला दिली खुन्नस

किम जोंगचा उन्माद, पुन्हा मिसाईल टेस्ट; अमेरिकेला दिली खुन्नस

उत्तर कोरियानं या वर्षातली तिसरी मिसाईल टेस्ट केली आहे. या टेस्टमधून त्यांनी अमेरिकेच्या कारवाईला उत्तर दिल्याचं मानलं जात आहे.

उत्तर कोरियानं या वर्षातली तिसरी मिसाईल टेस्ट केली आहे. या टेस्टमधून त्यांनी अमेरिकेच्या कारवाईला उत्तर दिल्याचं मानलं जात आहे.

उत्तर कोरियानं या वर्षातली तिसरी मिसाईल टेस्ट केली आहे. या टेस्टमधून त्यांनी अमेरिकेच्या कारवाईला उत्तर दिल्याचं मानलं जात आहे.

  • Published by:  desk news
सिऊल, 14 जानेवारी: उत्तर कोरियाने (North Korea) पुन्हा एका दोन बॅलेस्टिक मिसाईची चाचणी (Ballistic Missile Test) घेत अमेरिकेला (America) सडेतोड उत्तर (Reply) देण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या आठवड्यात घेतलेल्या क्षेपणास्त्रांच्या लागोपाठ 2 चाचण्यांमुळे उत्तर कोरियावर जगभरातून टीकेची झोड उठली होती. अमेरिकेनं नवे निर्बंधही जारी केले होते. मात्र आपण या निर्बंधांना जुमानत नसल्याचं दाखवत उत्तर कोरियानं पुन्हा दोन नव्या मिसाईलची चाचणी केली आहे.  उत्तर कोरियाचा उन्माद शुक्रवारी उत्तर कोरियाने दोन नव्या बॅलेस्टिक मिसाईलची चाचणी करून जगाला आणखी एक धक्का दिला आहे. उत्तर कोरियाची राजधानी सिऊलकडून पूर्वेच्या दिशेनं हे मिसाईल डागण्यात आले. उत्तर कोरियात बॅलेस्टिक मिसाईलची टेस्ट केल्याची नोंद जपानकडूनही करण्यात आली आहे. उत्तर कोरिया शेजारील राष्ट्रांची सुरक्षा धोक्यात टाकत असून कडक पावलं उचलण्यासाठी उकसवत असल्याचं जपाननं म्हटलं आहे.  अमेरिकेची प्रतिक्रिया उत्तर कोरिया क्षेपणास्त्राची चाचणी घेत असला तरी त्याचा काही फटका अमेरिका किंवा त्याच्या सहकारी देशांना बसण्याची शक्यता नाही, अशी प्रतिक्रिया अमेरिकेनं दिली आहे. मात्र प्रकारे बेकायदेशीरपणे आणि बेजबाबदारपणे एखादा देश शस्त्रास्त्रं हाताळत असेल, तर ती चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेनं दिली आहे.  तिसरी मिसाईल चाचणी या वर्षात उत्तर कोरियानं केलेली ही तिसरी मिसाईल चाचणी आहे. यापूर्वीच्या दोन चाचण्या या हायपरसोनिक मिसाईलच्या होत्या, तर तिसरी चाचणी बॅलेस्टिक मिसाईलची होती. उत्तर कोरियानं या तिन्ही चाचण्या केल्याचं मान्य केलं असून हुकूमशहा किम जोंग यांनी अधिक क्षमतेची क्षेपणास्त्रं तयार करण्याचे आदेश दिले आहेत.  हे वाचा - उत्तर कोरियाकडून समर्थन प्रत्येक देशाला आपल्या संरक्षणसज्जतेचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आपण घेतलेल्या मिसाईल टेस्टमुळे कुठल्याही शेजारी देशाला काहीही नुकसान झालेलं नाही. स्वतःच्या देशाचं संरक्षण करणं हा प्रत्येकाचा अधिकार असून त्यानुसार आम्ही आमच्या संरक्षणाची क्षमता वाढवत आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे. 
First published:

Tags: America, Ballistic missiles, Kim jong un, North korea

पुढील बातम्या