मराठी बातम्या /बातम्या /विदेश /भारतात पद्मश्री जाहीर..! ब्रिटनचे खासदार बॅरी गार्डिनर चिनी एजंट; गुप्तहेर संघटनेचा मोठा खुलासा

भारतात पद्मश्री जाहीर..! ब्रिटनचे खासदार बॅरी गार्डिनर चिनी एजंट; गुप्तहेर संघटनेचा मोठा खुलासा

गार्डिनर यांनी ब्रिटनमधील भारतीय समाजासाठी केलेलं काम आणि भारतीयांमध्ये त्यांनी मिळवलेली लोकप्रियता या आधारावरच त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची शिफारस करण्यात आली होती, मात्र त्यांचे खरे रूप उघड झाल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.

गार्डिनर यांनी ब्रिटनमधील भारतीय समाजासाठी केलेलं काम आणि भारतीयांमध्ये त्यांनी मिळवलेली लोकप्रियता या आधारावरच त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची शिफारस करण्यात आली होती, मात्र त्यांचे खरे रूप उघड झाल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.

गार्डिनर यांनी ब्रिटनमधील भारतीय समाजासाठी केलेलं काम आणि भारतीयांमध्ये त्यांनी मिळवलेली लोकप्रियता या आधारावरच त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची शिफारस करण्यात आली होती, मात्र त्यांचे खरे रूप उघड झाल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.

पुढे वाचा ...

 

लंडन, 14  जानेवारी: पद्म, पद्मश्री, पद्मविभूषण हे आपल्या देशातील (India) मानाचे नागरी पुरस्कार आहेत. 2020 या वर्षासाठी केंद्र सरकारनं ब्रिटनच्या (Britain) एका खासदाराला पद्मश्री पुरस्कार (Padma Shri) जाहीर केला आहे, मात्र त्यांच्याबाबत ब्रिटनच्याच गुप्तचर संघटनेनं (Britain) एक धक्कादायक खुलासा केल्यानं भारत सरकारच्या या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. यामुळे सरकारसमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. बॅरी गार्डिनर (Barry Gardiner)असं या खासदाराचं नाव असून ते ब्रिटनच्या लेबर पार्टीचे (Labour Party) सदस्य आहेत. गार्डिनर यांनी ब्रिटनमधील भारतीय समाजासाठी केलेलं काम आणि भारतीयांमध्ये त्यांनी मिळवलेली लोकप्रियता या आधारावरच त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्याची शिफारस करण्यात आली होती, मात्र त्यांचे खरे रूप उघड झाल्यानं सर्वांनाच धक्का बसला आहे.

ब्रिटनची गुप्तचर संस्था एमआय5 (MI5) ने बॅरी गार्डिनर हे चिनी एजंट (Chineese Agent) असल्याचं म्हटलं आहे. चीनकडून पैसे घेऊन बॅरी गार्डिनर यांनी ब्रिटनमधील लोकशाही प्रक्रियेला बाधा आणण्यासाठी कारवाया केल्याचा आरोप एमआय5नं केला आहे. या कामासाठी चीनच्या क्रिस्टीन चिंग कुई ली (Christine Ching Kui Lee) हिच्या लॉ फर्ममार्फत गार्डिनर यांच्या कार्यालयात पैसे पाठवले जात होते. क्रिस्टीनच्या फर्मची लंडन (London) आणि बर्मिंगहॅममध्येही कार्यालये आहेत.त्यांची फर्म लंडनमधील चिनी दूतावासासाठी (Chinese Embassy) कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम करते. एवढेच नाही तर बॅरी गार्डिनरने क्रिस्टीनचा मुलगा डॅनियल विल्कीस यालाही त्यांच्या ऑफिसमध्ये नोकरी दिली होती. मात्र, एमआय5नं गार्डिनर यांच्याबाबत हा धक्कादायक खुलासा केल्यानंतर डॅनियलने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला असल्याचं समजतं.

हेही वाचा- 10 हजार रुपये घ्या..! अन् Corona Positive सोबत करा डिनर पार्टी 

क्रिस्टीन हीदेखील चिनी गुप्तहेर असून, ती ब्रिटनमध्ये चीनमधील सत्ताधारी पक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या (Communist Party Of China) युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंट (UFWD) साठी काम करते. युनायटेड फ्रंट वर्क डिपार्टमेंटच्या आदेशानुसार, क्रिस्टीन ब्रिटनमध्ये राजकीय हस्तक्षेप आणि अस्थिरता निर्माण करण्यासाठी काम करते. ब्रिटिश सरकारनं चीनच्या हिताची धोरणं ठरवावी आणि निर्णय घ्यावेत यासाठी सदस्यांना प्रभावित करण्याचं काम तिच्यावर सोपवण्यात आलं आहे. यामध्ये बॅरी गार्डिनर तिला मदत करत असे. अर्थात चीनकडून पैसे घेणारे गार्डिनर हे एकटेच खासदार नसल्याचंही गुप्तचर संघटनेनं स्पष्ट केलं आहे. क्रिस्टीनने तिच्या लॉ फर्मद्वारे इतर पक्षांना आणि त्यांच्या खासदारांनाही निधी उपलब्ध करून दिला आहे. या गुप्तचर संघटनेनं सर्व पक्ष आणि खासदारांनाही चिनी हस्तक्षेपाविरोधात इशाराही दिला आहे.

हेही वाचा- IND vs SA : इशांत शर्माचा आदर करा, दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

दुसरीकडे, बॅरी गार्डिनर ब्रिटनमधील भारतीय समाजात (Indian Diaspora in Britain) लोकप्रिय आहेत. भारतीयांची संख्याही जास्त असलेल्या ब्रेंट नॉर्थमधूनच ते निवडून आले आहेत. गार्डिनर यांनी भारतीय समाजासाठी केलेलं काम आणि भारतीयांमध्ये त्यांनी मिळवलेली लोकप्रियता या आधारावरच त्यांना पद्मश्री देण्याची शिफारस करण्यात आली होती. परंतु ब्रिटनच्या गुप्तचर संघटनेनं केलेल्या खुलाशानंतर इथल्या भारतीयांमध्ये चिंतेची लाट पसरली आहे. 'बॅरी गार्डिनर यांनी या संदर्भात स्पष्टीकरण द्यावे. सत्य सांगावं. चीनचे हित साधण्यासाठी त्यांनी भारतावरही कोणत्याही प्रकारे प्रभाव टाकला आहे का, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, अशी मागणी भारतीय समुदायाचे नेते हरेंद्र जोधा यांनी केली आहे. गार्डिनर यांनी भारतीयांसाठी, विशेषतः गुजराथी लोकांसाठी केलेल्या कामासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला मात्र, कोरोना परिस्थितीमुळे ते हा सन्मान स्वीकारण्यासाठी भारतात गेले नाहीत. त्यांच्याबाबतच्या या खुलाशानंतर भारत आणि भारतीय समाज यांच्याशी असलेल्या त्यांच्या संबंधांवर विपरीत परिणाम होईल, असं मत ब्रिटनमधील एका भारतीय वंशाच्या नेत्यानं व्यक्त केलं आहे.

First published:

Tags: Britain, China, Narendra modi, Padma Shri