9 वर्षांनंतर रचला इतिहास, खासगी कंपनीनं अमेरिकेतून पाठवले अंतराळवीर

9 वर्षांनंतर रचला इतिहास, खासगी कंपनीनं अमेरिकेतून पाठवले अंतराळवीर

अमेरिकन वेळेनुसार दुपारी 3 वाजून 22 मिनिटांनी हे रॉकेट लाँच करण्यात आलं.

  • Share this:

फ्लोरिडा, 31 मे : अमेरिकेतील अंतराळ संस्था नासानं तब्बल 9 वर्षांनंतर इतिहास रचला आहे. आपल्या भूमीतून खासगी कंपनीच्या रॉकेटमधून अंतराळात दोन अंतराळवीरांना पाठवण्यात यश आलं. पहिल्यांदाच खासगी कंपनीच्या रॉकेटमधून अशापद्धतीनं अंतराळवीर पाठवण्यात आले आहेत. फ्लोरिडाच्या केप कॉन्वरलमधील जॉन एफ. केनेडी स्पेस सेंटरवरून NASA-SpaceX Demo-2 mission यशस्वीरित्या लाँच केलं. अमेरिकेनं 9 वर्षात पहिल्यांदाच आपल्या भूमीवरून अंतराळात अंतराळवीर पाठवले.

याआधी अमेरिका रशियाची मदत घेत होते. याआधी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवण्यासाठी जॉन एफ केनेडी सेंटरवरून उड्डाण घेण्यात आलं होतं अशी माहिती नासाच्या अॅडमिनिस्ट्रेटर जिम ब्रायडेनस्टीन यांनी दिली.

ब्रायडेनस्टीन आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात, 9 वर्षांत पहिल्यांदा अमेरिकेच्या भूमीवरून रॉकेटमार्फत अंतराळवीर पाठवण्यात आले आहेत. मला नासा आणि स्पेस टीमचा खूप अभिमान आहे'

Check out the first pictures from our remote cameras of the launch of a Falcon 9 rocket with #CrewDragon spacecraft on the Demo-2 mission with NASA astronauts @Astro_Doug and @AstroBehnken onboard! Check back for more images! #LaunchAmerica 🚀📷 - https://t.co/8due5jBg5Y pic.twitter.com/2QQkyVla17

— NASA HQ PHOTO (@nasahqphoto) May 30, 2020

twitter-tweet">

"American astronauts returned to space on an American rocket from American soil for the first time in nearly 10 years. You did it." - @VP Pence offers congratulations on #LaunchAmerica. pic.twitter.com/bpvoCeCr9U

— NASA (@NASA) May 30, 2020

हे वाचा-VIDEO: कोरोनाने हाहाकार असतानाच अमेरिकेतल्या 30 शहरांत भडकले दंगे

अमेरिकन वेळेनुसार दुपारी 3 वाजून 22 मिनिटांनी हे रॉकेट लाँच करण्यात आलं. काउंडाऊन संपताच या रॉकेटनं अवकाशात झेप घेतली. हे उड्डाण बुधवारी 28 मे रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र लाँच कऱण्याआधी 16 मिनीटं असताना खराब वातावरण निर्माण झाल्यानं लाँचिंग 2 दिवस पुढे ढकलावं लागलं.

Elon Musk कंपनीच्या SpaceX रॉकेटमधून अंतराळवीर रॉबर्ट बेहनकेन (Robert Behnken) आणि डग्लस हर्ले (Douglas Hurley) या दोन अंतराळवीरांना अमेरिकेच्या भूमीतून अंतराळात पाठवण्यात आले. 2011 मध्ये स्पेस शटल प्रोग्राम संपल्यानंतर ही मोहीम अमेरिकेनं पहिल्यांदाच हाती घेत यशस्वीपणे पार पाडली आहे. आतापर्यंत अमेरिका रशियाची मदत घेत होते. एका खासगी कंपनीच्या रॉकेटनं अंतराळात जाण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं सांगितलं जात आहे.

हे वाचा-हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या वापरात सर्वात मोठी तफावत; भारताने WHO ला दिलं पत्र

हे वाचा-चिकनमार्फत व्हायरस पसरणार? शास्त्रज्ञांच्या दाव्यामुळे पुन्हा प्रश्नचिन्हं

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 31, 2020, 7:16 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading