न्यूयॉर्क 30 मे: अमेरिकेत कोरोनाने हाहाकार माजलेला असताना आता हिंसाचाराचा वणवा पेटला आहे. एका कृष्णवर्णीय युवकाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर हा हिंसाचार उसळला असून त्याचं लोन आता अमेरिकेतल्या 30 शहरांत पसरलं आहे. जाळपोळ, लुटालूट होत असून अनेक शहरांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका ट्वीटमुळे आगीत तेल ओतल्याचा आरोप करण्यात येत आहे. अमेरिकेतल्या मिनेसोटा राज्यातल्या मिनीपोलिस शहरात जॉर्ज फ्लायड या कृष्णवर्णीय तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. जॉर्जला किरकोळ गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. त्याच्या हातात बेड्या होत्या आणि पोलीस त्याला रस्त्यात पाडून मारत होते. तो दयावया करत सोडण्याची मागणी करतत होता. मात्र पोलिसांनी त्याचा गळा आवळणं सुरूच ठेवलं आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या या मारहाणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरस झाला आणि पाहता पाहता हिंसाचार आणि दंग्यांचं लोन सर्व देशात पसरलं. या हिंसाचाराचे CNN ने दिलेले फोटो अंगावर शहारे आणणारे आहेत.
Morning after the protests and riots in Minneapolis of the police killing George Floyd. It’s eerie pic.twitter.com/UVF2ltmL7E
— Max Nesterak (@maxnesterak) May 28, 2020
न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टनमध्येही लोकांनी निर्दशने केलीत. जाळपोळ, इमारतींना आगी लावणं, दुकांनांची लुटालूट अशा घटना अनेक शहरांमध्ये घडल्या आहेत. त्यात दंगे आणि लुटालूट करणाऱ्यांना गोळ्या घालू असा इशारा अध्यक्ष ट्रम्प यांनी दिल्याने त्यांच्या ट्विट वरूनही प्रचंड गदारोळ झाला. या हिंसाचारात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या ट्वीटमुळे लोकांमध्ये संतापाची भावना आहे. तर ट्वीटरनेही त्यांची नापसंती व्यक्त केली.
माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही जॉर्जच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलंय.
या हिंसाचारानंतर अमेरिकेतल्या अनेक शहरांमध्ये सर्तकतेचा इशरा दिला असून दंगे होत असलेल्या शहरांमध्ये पहिल्यांदाच खास सुरक्षा दलं तैनात करण्यात आली आहेत.