हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या वापरात सर्वात मोठी तफावत; भारताने WHO ला दिलं पत्र

हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या वापरात सर्वात मोठी तफावत; भारताने WHO ला दिलं पत्र

जागतिक स्तरावर हायड्रोक्सिक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine) औषधाचा वापर योग्यरित्या केला जात नसल्याचे ICMR ने WHO च्या निदर्शनास आणून दिलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 मे : कोरोना रुग्णांवर (coronavirus patient) उपचारासाठी हायड्रोक्सिक्लोरोक्विन (Hydroxychloroquine) या अँटिमलेरिया औषधाचं ट्रायल जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) रोखला आहे. तरी भारतात (india) या औषधाचा वापर सुरूच आहे. भारतात या औषधाचे फारसे गंभीर दुष्परिणाम दिसून आलं नसल्याचं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) स्पष्ट केलं आहे. शिवाय आता इतर ठिकाणी याचे दुष्परिणाम का दिसून येत आहेत, तेदेखील भारताने दाखवून दिलं आहे.

भारत सोडून इतर ठिकाणी कोरोना रुग्णांना देण्यात आलेल्या हायड्रोक्सिक्लोरोक्विन औषधांच्या वापराबाबत मोठी चूक ICMR ने निदर्शनास आणून दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) याबाबत पत्र दिलं आहे. भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील चाचण्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या या औषधांच्या डोसमध्ये मोठी तफावत असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे.

हे वाचा - चिकनमार्फत पसरेल कोरोनापेक्षाही भयंकर व्हायरस; शास्त्रज्ञांनी केलं सावध

आयसीएमआरने सांगितलं, कोविड-19 चे गंभीर रुग्ण जे आयसीयूमध्ये भरती आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी केंद्र सरकारच्या प्रोटोकॉलनुसार, सकाळी आणि रात्री 400-400 एमजी डोस दिला जातो. त्यानंतर पुढील 4 दिवस सकाळी आणि संध्याकाळी 200-200 एमजी डोस दिला जातो. एकूण 5 दिवस कोरोनाच्या गंभीर रुग्णांना HCQ चा फक्त 2400 मिलीग्राम डोस दिला जातो

नाव न सांगण्याच्या अटीवर एएनआयशी बोलताना एका अधिकाऱ्याने आयसीएमआर आणि आरोग्य मंत्रालय जागतिक आरोग्य संघटनेशी याबाबत सहमत का नाही, याबाबत कारण सांगितलं. भारत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दिल्या जाणाऱ्या या औषधात मोठं अंतर आहे. ते म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर कोविड-19 रुग्णांना दिला जाणारा डोस 6 तासांत 800 मिलीग्राम x 2 लोडिंग डोस आणि त्यानंतर 10 दिवस 400 मिलीग्राम x 2 डोस दिले जातात. म्हणजे 11 दिवसांत 9600 मिलीग्रॅम डोस दिला जातो. जो भारतात दिल्या जाणाऱ्या डोसच्या चारपट जास्त आहे.

हे वाचा - जगात भारी VIDEO! 103 वर्षांच्या आजींनी कोरोनाला हरवताच उघडली बिअरची बॉटल

भारतात दिला जाणारा हायड्रोक्सिक्लोरोक्विनचा डोस जास्त प्रभावशाली आणि चांगला असल्याचा दावाही या अधिकाऱ्याने केला आहे. औषधाचा कमी डोस दिल्यानंतरही रुग्ण ठिक होत आहेत. या औषधामुळे कोरोना रुग्ण बरे होत असल्याचं सुरुवातीचं यश पाहता आयसीएमआरने डब्ल्यूएचओला पत्र दिलं आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 30, 2020, 3:26 PM IST

ताज्या बातम्या