नवी दिल्ली, 30 मे : सध्या कोरोनाव्हायरस (coronavirus) जगभर धुमाकूळ घालत आहे. हा व्हायरस नेमका कुठून आला हे अद्याप माहिती नाही मात्र वटवाघळांमार्फत हा व्हायरस पसरल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. आता वटवाघळांनंतर कोंबड्यांमार्फत (chicken) नवा व्हायरस पसरण्याचा धोका आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. चिकन फार्म्समधून (chicken farm) व्हायरस पसरेल, असा इशारा अमेरिकेतील शास्त्रज्ञ माइकल ग्रेगर यांनी दिला आहे. आज तक ने डेली मेलच्या रिपोर्टचा हवाला देत सांगितलं की, अमेरिकेतील शास्त्रज्ञ माइकल ग्रेगर यांनी चिकन फार्ममधून येणाऱ्या व्हायरसचा धोका हा जास्त असेल, यामुळे निम्मी लोकसंख्या संपुष्टात येईल, असा दावा केला आहे. हे वाचा - कोरोना वॅक्सीनची ट्रायल केलेल्या तरुणाचे झालेत असे हाल, वाचून बसेल मोठा धक्का माइकल ग्रेगर यांनी हाऊ टू सर्व्हाइव्ह अ पॅनेडॅमिक या आपल्या पुस्तकात म्हटलं आहे की, चिकन फार्ममुळे आता धोका वाढला आहे. चिकन फार्म्समधून निघणारे व्हायरस इतके धोकादायक ठरू शकतात की अर्ध्या जगाला धोका उद्भवू शकतो. माइकल ग्रेगल यांनी ही जी भविष्यवाणी वर्तवली आहे, त्याचे काही पुरावे समोर आले नाहीत किंवा इतर शास्त्रज्ञांनी त्यांच्या या दाव्याला दुजोरा दिलेला नाही. मात्र माइकल ग्रेगर यांचं म्हणणं आहे की, माणसांचा इतर जीवांशी इतक्या जवळच्या संबंधांमुळेच त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. हे वाचा - पहिल्यांदा कोरोनासंबंधी आली चांगली बातमी, उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा घटला चिकनमुळे व्हायरस पसरतो याबाबत जगातील शास्त्रज्ञांनी पुष्टी दिलेली नाही. शिवाय न्यूज 18 लोकमतही याची पुष्टी देत नाही. मात्र कोरोनाव्हायरस पसरल्यानंतर कित्येक देशातील तज्ज्ञांनी जगभरातील विविध जंगली जीवांचे मार्केट बंद करण्याची मागणी केलेली आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.