मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

मालदीवमध्ये मोठी दुर्घटना; 9 भारतीयांसह 10 जणांचा होरपळून मृत्यू

मालदीवमध्ये मोठी दुर्घटना; 9 भारतीयांसह 10 जणांचा होरपळून मृत्यू

मालदीवची राजधानी माले येथील एका इमारतीला लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीत परदेशी कामगार राहत होते.

मालदीवची राजधानी माले येथील एका इमारतीला लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीत परदेशी कामगार राहत होते.

मालदीवची राजधानी माले येथील एका इमारतीला लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीत परदेशी कामगार राहत होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

मालदीव 10 नोव्हेंबर : मालदीवची राजधानी माले येथील एका इमारतीला लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीत परदेशी कामगार राहत होते. इमारतीच्या तळमजल्यावर कार दुरुस्तीच्या गॅरेजमध्ये आग लागली. या घटनेत नऊ भारतीयांसह एका बांगलादेशी नागरिकाचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत.

इमारतीला आग लागल्यानंतर वरच्या मजल्यावरून 10 मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या कार दुरुस्तीच्या गॅरेजमध्ये ही आग लागली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही 10 मृतदेह बाहेर काढले आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे चार तास लागले. मृतांमध्ये नऊ भारतीय आणि एका बांगलादेशी नागरिकांचा समावेश असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

earthquake : नेपाळ भूकंपाने हादरला,आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, दिल्लीसह उत्तर भारतात जाणवले धक्के

मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तांनी माले येथील आगीच्या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. आम्ही मालदीव सरकारच्या संपर्कात असल्याचे उच्चायुक्तांनी सांगितले. या घटनेबाबत मालदीव सरकारच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मालदीव सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पोलीस मृतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मालदीवच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने ट्विट केले की, माले येथील या आगीत बळी पडलेल्यांसाठी स्टेडियममध्ये मदत आणि बचाव केंद्र उभारण्यात आले आहे. पीडितांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

ऑफिसमध्ये पेपर वाचता वाचता ह्रदयविकाराच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू, घटनेचा LIVE VIDEO

या घटनेनंतर मालदीवमध्ये वाईट परिस्थितीत राहणाऱ्या परदेशी कामगारांचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. मालदीवच्या राजकीय पक्षांनी म्हटले आहे की परदेशी कामगारांना येथे दयनीय परिस्थितीत राहावे लागते. मालदीवमध्ये परदेशी कामगारांची संख्या मोठी आहे. यातील बहुतांश कामगार हे भारत, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या देशांतील आहेत.

कोरोनाच्या काळात या परदेशी कामगारांच्या दयनीय स्थितीचे प्रकरण पहिल्यांदा समोर आले. त्यावेळी परदेशी कामगारांमध्ये स्थानिक लोकांपेक्षा तिप्पट वेगाने कोरोना पसरला.

First published:

Tags: Fire, Shocking news