नवी दिल्ली, 09 नोव्हेंबर : नेपाळमधील दोती जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणावले. 6.30 रिश्टर स्केलवर भूकंपाची नोंद झाली. भूकंपाच्या धक्क्याने एक घर कोसळले असून या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमध्ये आतापर्यंत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. पहाटे 2 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळपाठोपाठ नवी दिल्लीसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. मागील 24 तासांमध्ये 2 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.
नेपाळमध्ये पहाटे 2 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर 4.9 तीव्रतेचा दुसरा धक्का जाणवला. याआधी पहिला धक्का हा 6.3 तीव्रतेचा होता. एकापाठोपाठ दोन भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दिल्ली एनसीआरसह उत्तर आणि पूर्व भारतात काही ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणावले. नेपाळ सरकारच्या नॅशनल सिस्मोलॉजिकल सेंटरच्या नुसार, मागील 24 तासांमध्ये 2 वेळा भूकंप आला. तर एकदा आफ्टरशॉक धक्का जाणवला.
(Vande Bharat Train: ट्रेन आहे की विमान! 'या' हायस्पीड ट्रेनमध्ये लवकर मिळणार प्रवासाची संधी)
नेपाळमधील दोती जिल्ह्यात एक घर कोसळले. घराच्या ढिगाराखाली दबून 3 जणांचा मृत्यू झाला. बुधवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे दिल्ली आणि आसपासच्या परिसरातही धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार, भूकंपाचे केंद्रबिंदू हे जमिनीच्या खाली 10 किमी अंतरावर आहे. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या उत्तराखंडमधील पिथौरागडपासून 90 किमी. अंतरावर दक्षिण पूर्वमध्ये भूकंपाचे केंद्रबिंदू असल्याचे सांगितले जात आहे.
(Delhi Pollution : PHOTO पाहूनही गुदमरायला होईल; राजधानी दिल्लीतील भयानक वास्त)
मंगळवारी पहाटे देशात 4.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. दुसऱ्या भूकंपाचे केंद्रबिंदू काठमांडूपासून 155 किमी. उत्तर पूर्वमधील 100 किमी. परिसरात असल्याचे सांगितले जात आहे. याआधीही 19 ऑक्टोबरला काठमांडूमध्ये 5.1 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला होता. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (एनईएमआरसी)च्या नुसार 31 जुलैला काठमांडूमधील 147 किमी. दूर खोतांग जिल्ह्यात मार्टिम बिरता जवळ 6.0 तीव्रतेचा भूकंप आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Earthquake