Home /News /videsh /

किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत सस्पेन्स कायम, तब्बल 6 वर्ष अशी सुरू होती सर्जरीची तयारी

किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत सस्पेन्स कायम, तब्बल 6 वर्ष अशी सुरू होती सर्जरीची तयारी

किम जोंग यांच्या प्रकृतीविषयी अमेरिकन माध्यमांनी बातमी दिल्यानंतर किम यांची प्रकृती नाजूक असल्याचे चर्चा सुरू झाल्या.

    प्योंगयांग, 23 एप्रिल : उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (Kim Jong Un) यांची प्रकृतीविषयीची खरी माहिती फक्त त्यांच्या निकटवर्तीयांना असण्याची शक्यता आहे. दरदिवशी किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत विविध बातम्या येत आहेत. किम जोंग यांच्या प्रकृतीविषयी अमेरिकन माध्यमांनी बातमी दिल्यानंतर किम यांची प्रकृती नाजूक असल्याचे चर्चा सुरू झाल्या. मात्र दक्षिण कोरियानं या वृत्ताचे खंडन केले. दरम्यान, उत्तर कोरियाच्या सर्वात ताकदवान नेत्याची शस्त्रक्रिया त्यांच्या खासगी रुग्णालय आणि अत्यंत विशिष्ट डॉक्टरांच्या देखरेखीखाली करण्यात आल्याची, माहिती आहे. अत्यंत खास रुग्णालयात झाली शस्त्रक्रिया उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमधील रुग्णालयात किमवर उपचार का केले नाहीत, असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. ह्यंग सॅन येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. एनके डेली या वेबसाइटनुसार, किम यांच्यावर शस्त्रक्रिया करणार्‍या ह्यंग सॅनमधील डॉक्टरांची नेमणुक केवळ किम यांच्या कुटुंबावर उपचार करण्यासाठी करण्यात आली होती. 2014मध्ये किमची यांची प्रकृती नाजूक होती, तेव्हा सुद्धा याच रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले होते. 1994 मध्ये किमचे आजोबा किम इल सुंग यांच्या निधनानंतर हे रुग्णालय बांधले गेले. जगातील इतर कोणत्याही देशाचा याचा मागमूस येऊ नये म्हणून हे हॉस्पिटल हॉंग सॅनमध्ये बांधले गेले. वाचा-'जर हे खरं असेल तर...', किम यांच्या प्रकृतीबाबत ट्रम्प यांनी दिली प्रतिक्रीया किम याच्या उपचारांसाठी सुविधा वाढविण्यात आल्या किम जोंग उनच्या हृदयविकाराच्या काही वर्षांपूर्वी या रुग्णालयात संबंधित उपचारासाठी सर्व सुविधा तयार केल्या गेल्या. इस्पितळातील बहुतेक उपकरणे जर्मनी आणि जपानमधून मागवण्यात आल्या होत्या. किम यांची शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर हृदयविकार तज्ञ आहेत. किम जोंग यांच्यावर उपचार करण्यापूर्वी या डॉक्टरांना जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी पाठवले गेले. विशेष निवड प्रक्रियेअंतर्गत किमवर उपचार करण्यासाठी त्यांची निवड झाली. वाचा-किम जोंग उन यांची 3 मुलं जगासाठी एक रहस्य, बहीण होऊ शकते उत्तराधिकारी डॉक्टरांसाठी विशेष सुरक्षा या डॉक्टरला खास बॉडी गार्ड देण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त प्योंगयांग येथे त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. डॉक्टरांना कोणत्याही प्रकारच्या क्लिनिकल चाचण्या देखील परवानगी दिल्या आहेत. वाचा-किम जोंग उन यांना नेमकं झालं काय? Grave Danger चा काय आहे अर्थ? सीएनएनने केला होता दावा सीएनएनच्या म्हणण्यानुसार किम जोंग यांनी 4 दिवसांआधी एक बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी देशाच्या मुख्य मंत्रिमंडळातही अनेक मोठे बदल केले. 2011पासून उत्तर कोरियामध्ये किम सत्तेवर आल्यापासून, त्यांनी एकही कामाचा दिवस चुकवला नाही आहे. दरम्यान,अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या एका छायाचित्रात उत्तर कोरियाचे वरिष्ठ अधिकारी कुमुसनमधील पॅलेस ऑफ सन येथे किम इल सुंग यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत, असा दावा केला आहे. संपादन, संकलन-प्रियांका गावडे
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या