किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत दक्षिण कोरियामधून आली सर्वात मोठी बातमी

किम जोंग यांच्या प्रकृतीबाबत दक्षिण कोरियामधून आली सर्वात मोठी बातमी

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने किम जोंग उन यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती दिली होती. मात्र आता दक्षिण कोरियाने हे दावे खोटे असल्याचे सांगितले आहे.

  • Share this:

सियोल, 21 एप्रिल : उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (Kim Jong Un) यांची प्रकृती नाजूक असल्याची बातमी अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी दिली होती. मात्र दक्षिण कोरियातील सरकारी सूत्रांनी ही बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. याआधी सीएनएनने असा दावा केला होता की, किम जोंग यांची यापूर्वी हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. प्रकृती अद्याप नाजूक असून अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्या मृत्यूची शक्यताही व्यक्त केली होती.

मात्र, दक्षिण कोरिया सरकारच्या म्हणण्यानुसार किम जोंग-उनवर उपचार सुरू आहेत. मात्र त्यांची प्रकृती नाजूक असल्याची बातमी खोटी असल्याचे सांगितले आहे. किम जोंग यांनी अलीकडेच देशाच्या राष्ट्रीय सुट्टीच्या कार्यक्रमात भाग घेतला नव्हता, त्यानंतर त्यांच्या आजारपणाविषयी चर्चा सुरू झाल्या.

वाचा-उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांची हृदय शस्त्रक्रिया अयशस्वी, जीवाला धोका

'शस्त्रक्रिया यशस्वी झाली, आता विश्रांती घेत आहेत किम'

न्यूज एजन्सी रॉयटर्सने डेली एनके या सियोलच्या न्यूज वेबसाइटच्या हवाल्याने असे वृत्त दिले आहे की, किम यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. सध्या त्यांना माउंट कुमगांग येथील रिसॉर्टमध्ये विश्रांतीसाठी ठेवण्यात आले आहे. या वृत्तानुसार, 12 एप्रिल रोजी किम जोंग यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे दक्षिण कोरियाचे मंत्रालय आणि नॅशनल इंटेलिजन्स सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना तातडीने वृत्ताबाबत सांगता येणार नाही. दोन कोरियन देशांमधील प्रकरणे हाताळणारे युनिफिकेशन मंत्रालय म्हणाले की, प्योंगयांग येथे किम यांच्यावर हृदयविकाराची शल्यक्रिया झाली आहे, मात्र त्यांची प्रकृती सुधारत आहे.

वाचा-परदेशी नागरिकांना अमेरिकेत NO ENTRY, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

सीएनएनने केला होता दावा

सीएनएनच्या म्हणण्यानुसार किम जोंग यांनी 4 दिवसांआधी एक बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी देशाच्या मुख्य मंत्रिमंडळातही अनेक मोठे बदल केले. 2011पासून उत्तर कोरियामध्ये किम सत्तेवर आल्यापासून, त्यांनी एकही कामाचा दिवस चुकवला नाही आहे. दरम्यान,अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या एका छायाचित्रात उत्तर कोरियाचे वरिष्ठ अधिकारी कुमुसनमधील पॅलेस ऑफ सन येथे किम इल सुंग यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत, असा दावा केला आहे.

वाचा-एकूलती एक मुलगी आणि 100 किमी पायी प्रवास, हाकेच्या अंतरावर घर असताना मृत्यू

किम यांनी बहिणीला दिल्या सर्व महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या

किम जोंग यांनी त्यांची धाकटी बहीण किम यो जोंग यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या दिल्या आहेत. किम यो यांचा देशासाठी मोठे निर्णय घेणाऱ्या अभिजात गटात समावेश करण्यात आला आहे. हा गट उत्तर कोरिया देशातील सर्व महत्त्वाचे निर्णय घेतात. किम योच्या प्रवेशानंतर असे मानले जाते की किम जोंग उननंतर ती आता सर्वात ताकदवान नेता बनली आहे. किम यो जोंग हे किम जोंग यांचे राजकीय सल्लागारही मानले जातात.

संपादन, संकलन-प्रियांका गावडे

First published: April 21, 2020, 1:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading