परदेशी नागरिकांना अमेरिकेत NO ENTRY, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

परदेशी नागरिकांना अमेरिकेत NO ENTRY, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

जोपर्यंत कोरोना संसर्गाची प्रकरणे पुढे येत राहतील, कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे तात्पुरते बंद असेल.

  • Share this:

वॉशिंग्टन, 21 एप्रिल : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाची वाढती आपत्ती लक्षात घेता सोमवारी एक मोठा निर्णय घेतला. ट्रम्प यांनी परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. अमेरिकेतील नागरिकांच्या नोकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी आणि एका अदृश्य शत्रूशी (कोरोनाव्हायरस) सामोरे जाण्यासाठी असा निर्णय घेतले असल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी ट्वीट करत, मी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली ज्यानुसार इतर कोणत्याही देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही.

सीएनएनच्या म्हणण्यानुसार अध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी संध्याकाळी उशिरा या कार्यकारी आदेशावर सही केली आहे. त्यानुसार जोपर्यंत कोरोना संसर्गाची प्रकरणे पुढे येत राहतील, कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येण्यावर तात्पुरती बंदी असेल.  ट्रम्प यांचा असा विश्वास आहे की कोरोना केवळ विमानतळांद्वारे म्हणजेच परदेशातून येणाऱ्या लोकांमुळे अमेरिकेत पसरल.  त्यामुळे देशाचे आरोग्य आणि अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी आता इतर कोणत्याही देशातील नागरिकांच्या देशात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

वाचा-...तर कोरोनामुळे परिस्थिती आणखी वाईट होईल, WHOने दिला साऱ्या जगाला इशारा

वाचा-देशात 18,000 वर पोहोचली कोरोना रुग्णांची संख्या, आतापर्यंत 590 मृत्यू

'देशवासियांच्या नोकऱ्या वाचवतोय'

ट्रम्प यांनी परदेशी नागरिकांवर बंदी घालून स्थानिक रहिवाशांच्या नोकर्‍या वाचवण्याचा दावा केला आहे. ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की कोरोनाशी लढा देण्यासाठी आणि नोकरी वाचवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे थांबवण्यासाठी काय धोरण असेल किंवा हे किती काळ लागू केले गेले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार हे तात्पुरते आहे आणि परिस्थिती सुधारताच माघार घेतली जाईल. या आदेशाचा क्रॉस बॉर्डर ऑपरेशनवर काय परिणाम होणार आहे आणि ज्यांच्याकडे ग्रीन कार्डे आहेत त्यांना अद्याप व्हाईट हाऊसने स्पष्ट केले नाही.

वाचा-कोरोना संकटात इतिहासात पहिल्यांदाच कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्या, काय आहे दर?

कोरोना संसर्गामुळे 42 हजारांहून अधिक मृत्यू

सोमवारी अमेरिकेत कोरोना संसर्गाची 28,123 नवीन प्रकरणे नोंदली गेली, त्यानंतर एकूण प्रकरणे वाढून 7 लाख 92 हजारपेक्षा जास्त झाली आहेत. गेल्या चोवीस तासांत येथे 1939 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता एकूण मृतांची संख्या 42 हजार 514वर पोहचली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या लोकांना पाठिंबा दिल्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये निषेधाचे वातावरण पसरले आहे.

First published: April 21, 2020, 9:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading