Home /News /news /

एकूलती एक मुलगी आणि 100 किमी पायी प्रवास, हाकेच्या अंतरावर घर असताना ओढावला मृत्यू

एकूलती एक मुलगी आणि 100 किमी पायी प्रवास, हाकेच्या अंतरावर घर असताना ओढावला मृत्यू

जमलो तब्बल तीन दिवस 13 इतर लोकांसह पायी प्रवास करत होती. यात तीन मुले आणि आठ महिलांचा समावेश आहे.

    विजापूर, 21 एप्रिल : कोरोनामुळे देशात 3 मे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. यामुळे लोकं घरात कैद आहेत, तर घरापासून दूर असलेले मजूर घरी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशाच आपल्या घरी जाणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीसोबत एक दुर्दैवी प्रकार घडला. छत्तीसगडच्या विजापूर येथून 12 वर्षांची जमलो मडकम आपल्या घरी जात होती. 2 महिन्यांआधी जमलो आपल्या काही नातेवाईकांसह शेतात काम करण्यासाठी तेलंगणा येथे गेली होती. मात्र लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर जमलोसह इतरांना घरी जाण्याची ओढ लागली. रविवारी घरी परत येण्याच्या प्रयत्नात असताना, घराच्या सीमेवरच जमलोचा मृत्यू झाला होता. जमलो तब्बल तीन दिवस 13 इतर लोकांसह पायी प्रवास करत होती. यात तीन मुले आणि आठ महिलांचा समावेश आहे. यावेळी या लोकांनी सुमारे 100 किमीचा प्रवास केला. मात्र थकव्यामुळे 100 किमी चालूनही जमलो घरी पोहचली नाही. अधिकाऱ्यांच्या मते इलेक्ट्रोलाइटचे असंतुलन आणि थकव्यामुळे जमालोचा मृत्यू झाला. एकूलती एक मुलगी होती जमलो इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अंदोरम आणि मडकम यांची जमलो ही एकूलती एक मुलगी होती. जमलोचे कुटुंबिय उपजीविकेसाठी जंगलांच्या उत्पादनांवर अवलंबून आहेत. त्यामुळे चार पैसे जादा कमवण्यासाठी जमलो पहिल्यांदाच घराबाहेर पडली होती. परदेशी नागरिकांना अमेरिकेत NO ENTRY, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय अंदोरमने सांगितले की, ती यावर्षी तेलंगणामध्ये मिर्ची शेतात काम करण्यासाठी गेली होती. आता मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जमलोच्या कुटुंबियांना एक लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. 14 एप्रिल रोजी सोडले होते तेलंगणा अंदोरम यांनी सांगितले की ते जेव्हा जमालोबद्दल शेवटचे ऐकले होते, तेव्हा ती तेलंगणामधील पेरुर गावाजवळ होती. कोरोना संसर्गामुळे वाढलेल्या लॉकडाऊननंतर त्यांना तेथे काम मिळणार नव्हते. म्हणून छत्तीसगडमधील आपल्या गावी परतण्यासाठी सर्वांनी पायी प्रवासास सुरुवात केली. 4 दिवसांनी 18 एप्रिल रोजी जमलोचा मृत्यू झाला. विजापूरच्या सीमेवर झाला मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, 18 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता जमालोचा मृत्यू झाला. यावेळी सर्व लोक विजापूर जिल्ह्याच्या सीमेवर पोहोचले होते. पण त्यावेळी जमलोच्या कुटुंबाला हे लोक सांगू शकले नाहीत कारण त्यांच्याकडे एकच मोबाइल होता आणि त्यांची बॅटरीही संपली होती.
    'कोरोनाच्या संकटातही प्रेम आणि आशेचा किरण', नर्स दाम्पत्याचा PHOTO VIRAL नंतर जेव्हा हे लोक भंडारपाल गावात पोहोचले तेव्हा जमलोच्या कुटुंबियांना याची माहिती मिळाली. यानंतर भांडारपालच्या लोकांनीही कोरोना संक्रमणाच्या भीतीने पोलिसांना बोलावले. 12 लोकांना केले क्वारंटाइन या प्रकरणाची माहिती मिळताच वैद्यकीय पथक लगेचच भंडारपाल गावात पोहोचले, परंतु यावेळी त्यांना तेथे कोणी मिळाले नाही. नंतर या पथकाने या लोकांना गावाबाहेर रोखले. जमालोचा मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आला आणि इतर सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी त्याचा मृतदेह घेण्यासाठी जमलोचे कुटुंबीय दाखल झाले. जमालोच्या मृत्यूच्या दुसर्‍याच दिवसानंतर तिची कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र जमोलाचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले. संपादन, संकलन-प्रियांका गावडे
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या