उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग यांची हृदय शस्त्रक्रिया अयशस्वी, जीवाला धोका

सीएनएनच्या म्हणण्यानुसार किम जोंग यांनी 4 दिवसांआधी एका बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी देशाच्या मुख्य मंत्रिमंडळातही अनेक मोठे बदल केले.

सीएनएनच्या म्हणण्यानुसार किम जोंग यांनी 4 दिवसांआधी एका बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी देशाच्या मुख्य मंत्रिमंडळातही अनेक मोठे बदल केले.

  • Share this:
    प्योंगयांग, 21 एप्रिल : उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन  (Kim Jong Un) यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या म्हणण्यानुसार किम जोंग यांची यापूर्वी हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. मात्र ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली नाही. प्रकृती अद्याप नाजूक असून अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्या मृत्यूची शक्यताही व्यक्त केली जात आहे. किम जोंग यांनी अलीकडेच देशाच्या राष्ट्रीय सुट्टीच्या कार्यक्रमात भाग घेतला नव्हता, त्यानंतर त्यांच्या आजारपणाविषयी अटकळ सुरू झाली. 15 एप्रिल रोजी किम जोंग उनचे यांचे आजोबा आणि देशाचे निर्माते किम इल सुंग यांची जयंती असते. हा दिवस उत्तर कोरिया राष्ट्रीय सुट्टीप्रमाणे साजरा करतो. परदेशी नागरिकांना अमेरिकेत NO ENTRY, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय सीएनएनच्या म्हणण्यानुसार किम जोंग यांनी 4 दिवसांआधी एका बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी देशाच्या मुख्य मंत्रिमंडळातही अनेक मोठे बदल केले. 2011पासून उत्तर कोरियामध्ये किम सत्तेवर आल्यापासून, त्यांनी एकही कामाचा दिवस चुकवला नाही आहे. दरम्यान,अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या एका छायाचित्रात उत्तर कोरियाचे वरिष्ठ अधिकारी कुमुसनमधील पॅलेस ऑफ सन येथे किम इल सुंग यांना श्रद्धांजली वाहताना दिसत आहेत, असा दावा केला आहे. राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचला कोरोना, तब्बल 125 कुटुंबांना केलं क्वारंटाईन किम यांच्या आजारपणाचा याआधीही दावा राज्य मीडिया चॅनेल्स आणि सरकारी कार्यक्रमांमध्ये उत्तर कोरियाचे नेते किम जोंग यांच्या अनुपस्थितीमुळे याधीही ते आजारी असल्याचा दावा करण्यात आला होता. किम यांना सत्ता सोडायची नसल्यामुळे ते आपल्या प्रकृतीबाबत माहिती लपवल्याचा दावा केला होता. मात्र उत्तर कोरिया सातत्याने असे दावे असल्याचे सांगितले होते. किम यांनी बहिणीला दिल्या सर्व महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या किम जोंग यांनी त्यांची धाकटी बहीण किम यो जोंग यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या दिल्या आहेत. किम यो यांचा देशासाठी मोठे निर्णय घेणाऱ्या अभिजात गटात समावेश करण्यात आला आहे. हा गट उत्तर कोरिया देशातील सर्व महत्त्वाचे निर्णय घेतात. किम योच्या प्रवेशानंतर असे मानले जाते की किम जोंग उननंतर ती आता सर्वात ताकदवान नेता बनली आहे. किम यो जोंग हे किम जोंग यांचे राजकीय सल्लागारही मानले जातात. संपादन, संकलन-प्रियांका गावडे
    First published: