पसरत होता कोरोना, तरी वुहान सोडून परतला नाही भारतीय; कारण वाचून कराल सलाम

पसरत होता कोरोना, तरी वुहान सोडून परतला नाही भारतीय; कारण वाचून कराल सलाम

76 दिवस वुहानमध्ये जीव धोक्यात टाकून राहत होता भारतीय. पण सोडली नाही जिद्द.

  • Share this:

वुहान, 10 एप्रिल : चीनमध्ये वुहानपासून कोरोनाचा प्रसार जगभरात सुरू झाला. त्यानंतर 23 जानेवारी रोजी वुहानमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. आता 76 दिवसांनी म्हणजे 8 एप्रिल रोजी लॉकडाऊन हटवण्यात आला. त्यामुळं तब्बल 3 महिन्यांनी वुहान शहर मुक्त झाले. वुहान हे कोरोनाचे केंद्र होते, या शहरात तब्बल 3300 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झाला. वुहानमध्ये 82 हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली. ताज्या सरकारी आकडेवारीवर नजर टाकल्यास गेल्या काही आठवड्यांत शहरातील कोरोनाची प्रकरणे झपाट्याने कमी झाली आहेत. मात्र वुहानमध्ये लॉकडाऊनच्या काळात अशी काही लोकं होती, जे हिम्मत न हारता कोरोनाशी लढा देत होते.

वुहानमध्ये कोरोना थैमान घालत असताना एक भारतीय कुटुंब मात्र तेथेच राहत होते. त्यांनी अशा परिस्थितीतही वूहान शहरात राहण्याचे धैर्य दाखविले. जेव्हा कोरोनाचा प्रसार वुहानमध्ये होत होता तेव्हा ते भारतात परत येऊ शकत होते, मात्र त्यांनी परत न जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागचे कारण वाचून, तुम्हीही त्यांचे कौतुक कराल.

वाचा-निवृत्तीनंतरही देशसेवा संपली नाही,जवानाने दान केले पेन्शन आणि बचतीचे 15 लाख

वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना वुहानमधील भारतीय नागरिक म्हणाले की ते खूप आनंदित आहेत. लॉकडाउन काढल्यानंतर त्याला बरे वाटू लागले आहे. बुधवारी मध्यवर्ती चिनी शहरातील अधिकाऱ्यांनी 11 लाख लोकांवरील बंदी उठवली. वुहानमध्ये काम करणारे हायड्रोबायोलॉजिस्ट अरुणजीत टी सथराजीथ यांनी लॉकडाऊन हटवल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, "लॉकडाऊन हटवल्यानंतर मी मोकळेपणाने बोलू शकतोय, कारण इतके दिवस माझ्याशी बोलण्यासाठी कोणीच नव्हते. प्रत्येकजण घरातच राहत होते". मुख्य म्हणजे लॉकडाऊन हटवल्यानंतर वुहान शहरातील यँग्झी नदीच्या काठी एक उत्सव आयोजित करण्यात आला होता.

वाचा-कोरोनामध्ये होऊ शकतात दहशतवादी हल्ले, संयुक्त राष्ट्र संघटनेने दिला इशारा

वुहानमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी पाठवले होते विमान

भारताने वुहानमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी विमाने पाठविली, त्यावेळी अरुणजीतने वुहानमध्येच राहण्याचे ठरवले होते. अरुणजीत मुळचे केरळचे आहेत. त्यांचा असा विश्वास होता की अडचणीच्या परिस्थितीत पळून जाणे किंवा तेथून पळून जाणे ही भारतीयांसाठी आदर्श गोष्ट नाही. दुसरीकडे, अरुणजितला हे चांगले ठाऊक होते की जर ते भारतात परतले तर, आपल्याच देशातील लोकांना याचा धोका वाढेल. त्यामुळे त्यांनी वुहानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

वाचा-'हम पाच', पुण्यात एकाच घरातील 5 जणांनी केली कोरोनावर मात

'लॉकडाऊनचा भारताला नक्की फायदा होईल'

अरुणजित म्हणाले की लॉकडाउनचा निर्णय कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी कौतुकास्पद पाऊल आहे. परंतु भारतासाठी मोठी समस्या जुलै महिन्यात येऊ शकते. कारण यावेळी पावसामुळे लोकांना खोकला, सर्दी, ताप येणे सामान्य आहे. अशा परिस्थितीत रोग प्रतिकारशक्ती पातळी कमी होते. दुसरीकडे, कोरोना विषाणूशी लढण्यासाठी शरीराची प्रतिकारशक्ती पातळी मजबूत करणे आवश्यक आहे.

वाचा-'मुलांना जवळ घेण्यासाठी जीव तुटतो पण...', कोरोना पॉझिटिव्ह नर्स आईची कहाणी

वुहानमध्ये उत्सवाचे वातावरण

लॉकडाउनच्या शेवटी वुहान शहरातील यँग्झी नदीच्या काठी एक उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी, अ‍ॅनिमेटेड प्रतिमांच्या मदतीने आरोग्य कर्मचारी आणि कोरोना रूग्णांची छायाचित्रे दाखवण्यात आली. त्याच वेळी वुहानला एक वीर शहर म्हणून चित्रित केले गेले होते. यावेळी लोक खूप उत्साही होते. लॉकडाउन हटवण्यापूर्वी शहर अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानक आणि विमानतळांना भेट दिली आणि शहर लॉकडाऊन संपेपर्यंत पूर्णपणे तयार असल्याचे सुनिश्चित केले.

संकलन, संपादन-प्रियांका गावडे.

First published: April 10, 2020, 12:14 PM IST

ताज्या बातम्या