'मुलांना जवळ घेण्यासाठी जीव तुटतो पण...', कोरोना पॉझिटिव्ह नर्स आईची हृदयद्रावक कहाणी

आता डॉक्टर आणि नर्सही यांनाही कोरोनाचा धोका जाणवू लागला आहे. दिल्लीच्या रुग्णालयातील 22 कर्मचार्‍यांनी कोरोनाची लागण झाली.

आता डॉक्टर आणि नर्सही यांनाही कोरोनाचा धोका जाणवू लागला आहे. दिल्लीच्या रुग्णालयातील 22 कर्मचार्‍यांनी कोरोनाची लागण झाली.

  • Share this:
    नवी दिल्ली, 10 एप्रिल : कोरोनाव्हायरस भारतात वेगाने पसरत आहे. आतापर्यंत 6 हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आता डॉक्टर आणि नर्सही यांनाही कोरोनाचा धोका जाणवू लागला आहे. स्वत:ची पर्वा न करता रुग्णांची सेवा करणाऱ्या वैद्यकिय कर्मचाऱ्यांनाही धोका वाढत आहे. अशीच एक कहाणी दिल्ली राज्य कर्करोग संस्था (डीएससीआय) येथे काम करणार्‍य नर्सची आहे. या रुग्णालयातील 22 कर्मचार्‍यांनी कोरोनाची लागण झाली. लेकीच्या वाढदिवसाचा रुग्णालयात होत्या इंग्रजी वृत्तपत्र दि इंडियन एक्सप्रेसनुसार कोरोना पॉझिटिव्ह या नर्सच्या चार वर्षांच्या मुलाचा वाढदिवस असातान त्या घरी नव्हत्या. लेकीच्या वाढदिवसादिवशी नर्स आणि त्यांच्या दोन्ही मुली दिल्लीच्या राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होत्या. कारण त्यांच्या मुलांची काळजी घेण्यासाठी घरी कोणी नव्हतं. या परिस्थितीबाबत सांगताना, "आम्ही मुळचे केरळचे आहोत. गेल्या महिन्यात माझ्या सासूची तब्येत खालावली. अशा परिस्थितीत माझ्या पतीला केरळला जावे लागले. घरी मोलकरीण असेल तर ती मुलांचीही काळजी घेते. मात्र लॉकडाऊनमुळे तिने काम बंद केले. माझा नवरा केरळमध्ये अडकला आहे. त्यामुळे मुलांना माझ्या मित्राकडे ठेवले आहे", असे सांगत व्यक्त दु:ख केले. वाचा-कोरोनाशी सामना करणाऱ्या 2 परिचारिकांनाच लागण, दादरमध्ये आढळले 3 रुग्ण नर्सची टेस्ट आली पॉझिटिव्ह दिल्ली राज्य कर्करोग संस्था येथील 22 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. यात या नर्सचाही समावेश आहे. त्यामुळं त्या सध्या रुग्णालयात उपाचर घेत आहेत. मुलांना आईची गरज असताना, त्यांच्या काळजीपोटी त्या त्यांना भेटू शकत नाही. फक्त व्हिडीओ कॉलवरून त्या आपल्या मुलांशी संवाद साधतात. वाचा-भारतात कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात, ICMRने दिला इशारा मुंबईतही परिचारिकांना कोरोनाची लागण हाराष्ट्राची राजधानी मुंबईला कोरोनाने विळखा घातला आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. मुंबईचं ह्रदयस्थान असलेल्या दादरमध्ये आज 3 नवे रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामध्ये 2 परिचारिकांचा समावेश आहे. दादरमध्ये आज 3 नवे रुग्ण आढळले आहे. यामध्ये शुश्रुषा रुग्णालयातील 2 परिचारिकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या परिचारिकांचं वय अनुक्रमे 27 आणि 42 आहेत. वाचा-धारावीत कोरोनाचा कहर, आज सापडले आणखी 5 रुग्ण, एकूण संख्या 22 वर
    First published: