न्यूयॉर्क, 10 एप्रिल : कोरोना विषाणूच्या जागतिक संकटावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची (UNSC) बैठक झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी यावेळी कोरोना किती धोकादायक आहे, ही पिढ्यांची लढाई आहे आणि संयुक्त राष्ट्राला या कठीण काळात सामोरे जावे लागले, असेही सदस्यांना सांगितले. या बैठकीत अँटोनियो गुटेरेस यांनी दहशतवादी कोरोनाचा फायदा घेऊ शकतात, असा इशाराही दिला. गुटेरेस यांनी, “दहशतवादी संघटना दहशत पसरविण्यासाठी हल्ले करू शकतात. कारण सर्व देश सध्या कोरोना या साथीच्या आजाराला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे दहशतवादी हल्ले होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. ही संस्था स्थापन झाली तेव्हापासून जगातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी परीक्षा आहे. आपल्याला एकत्र सामोरे जावे लागेल. यासाठी सज्ज व्हा”, असे आवाहन केले. वाचा- पृथ्वीवर आणखी एका संकटाची चाहूल, ओझोनवरील छिद्र 1 दशलक्ष चौरस किलोमीटर वाढलं
वाचा- भारतात कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात, ICMRने दिला इशारा अँटोनियो गुटेरेस या बैठकीदरम्यान म्हणाले की, “अचानक उद्भवलेल्या या धक्क्यावर मात करण्यासाठी आपण सर्वजण संघर्ष करीत आहोत. ज्यांच्या नोकर्या गेल्या आहेत आणि व्यवसाय ठप्प आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त आपण आपल्या दैनंदिन जीवनात मूलभूत आणि तीव्र बदलांचा सामना करत आहोत. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे सर्वात वाईट काळ अद्याप येणे बाकी आहे, विशेषत: विकसनशील देशांमध्ये आणि त्या देशांमध्ये आधीच सशस्त्र संघर्षाचा सामना करावा लागला आहे”. जगभरात सध्या 16 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, 95 हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. येत्या काळात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाचा- एप्रिल अखेरीस कोरोनापासून होणार सुटका? असा आहे मोदी सरकारचा प्लॅन कोरोनाच्या उद्रेकावर संयुक्त राष्ट्रांच्या या सर्वात शक्तीशाली संस्थेने मौन बाळगले होते. अखेर आज संक्षिप्त पत्रकार विधान जारी केले ज्यामध्ये, यात वरील सर्व बाबींचा उल्लेख केला. सरचिटणीसांच्या निवेदनात सर्व देशांना पुन्हा एकदा आपापले मतभेद विसरून या साथीने पीडित देश आणि लोकांना मदत करावी लागेल, असे आवाहनही करण्यात आले होते.