नवी दिल्ली 02 मार्च : रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या आठवड्यापासून युद्ध (Russia Ukraine War) चालू आहे. शिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यासाठी सरकारकडून ऑपरेशन गंगा (Operation Ganga) नावाची मोहीम राबवण्यात येत आहे. युद्ध सुरू असल्यामुळे युक्रेनच्या हद्दीत विमान उड्डाणासही बंदी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोल्दोव्हा आणि बुखारेस्टमार्गे भारतात आणले जाणार आहे. दरम्यान नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याठिकाणी जात विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे (Jyotiraditya Scindia at Bucharest airport).
Russia-Ukraine War : रशियन सैन्याचा युक्रेनमध्ये टीव्ही टॉवरवर हल्ला, LIVE VIDEO
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया बुधवारी युद्धग्रस्त भागातून भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी रोमानियाला पोहोचले. युक्रेनमधून निर्वासन ऑपरेशनच्या अंमलबजावणीसाठी भारत सरकारने चार विशेष दूत नियुक्त केले आहेत, त्यापैकी एक ज्योतिरादित्य सिंधिया आहेत. बुखारेस्टला पोहोचल्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी रोमानियातील युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेबाबत विमानतळावरच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच विमानतळावर आपल्या वळणाची वाट पाहत उपस्थित भारतीय विद्यार्थ्यांशी चर्चा केली. बुखारेस्ट विमानतळावर थांबवलेल्या महाराष्ट्रातील काही मेडिकलच्या विद्यार्थ्यांसोबत त्यांनी संवाद साधला. याचा व्हिडिओ (Jyotiraditya Scindia Video) आता समोर आला आहे.
Civil Aviation Minister @JM_Scindia provides a healing touch to medical students from Maharashtra waiting at the Bucharest airport ! Speaks in Marathi, reassures all assistance ! This is how crises are handled by @narendramodi Govt ! #OperationGanga ! pic.twitter.com/jse1HtRj0L
— Dr. VINAY Sahasrabuddhe। डॅा. विनय सहस्रबुद्धे (@Vinay1011) March 2, 2022
व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की ज्योतिरादित्या सिंधिया हे बुखारेस्ट विमानतळावर थांबलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. ते हे विद्यार्थी कुठले आहेत, याची विचारपूस करताना दिसतात. इतक्यात एक विद्यार्थीनी आपण महाराष्ट्रातील असल्याचं सांगते. यानंतर अतिशय आपुलकीने ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या तरुणीसोबत मराठीत संवाद साधला.
नवीन मृत्यूच्या आधी फोनवर नेमकं काय म्हणाला? मित्राने टाहो फोडत सांगितला थरार
ज्योतिरादित्या सिंधियांनी इथे असलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचं आश्वासन देत काहीही काळजी करू नका, असा सल्ला दिला. सोबतच तुम्ही सगळे इथून भारताकडे रवाना होत नाही, तोपर्यंत मीदेखील इथेच आहे, असंही ते म्हणाले. यासोबतच उद्याही 4 फ्लाईटची व्यवस्था केली असून हजारो विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात येईल, असंही ते म्हणाले.