युक्रेन, 01 मार्च : युक्रेन आणि रशियामध्ये (Russia-Ukraine War) युद्धाचा भडका उडाला आहे. आज सकाळपासून रशियन सैनिकांनी अधिक आक्रमकपणे हल्ला चढवला आहे. आता रशियन सैन्याने एका टीव्ही टॉवर हल्ला चढवला आहे. मिसाईलचा मारा करून टॉवर उद्धवस्त केले आहे. युद्धाच्या पाचव्या दिवशी रशियाने युक्रेनविरुद्ध जोरदार मोहिम उघडली आहे. सकाळपासून अनेक ठिकाणं रशियाने उद्धवस्त केली आहे. युक्रेनमधील टीव्ही टॉवरवर हल्ला चढवून उद्धवस्त केले आहे. मिसाईलचा मारा करून पूर्ण टॉवर नष्ट केले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. युक्रेनमध्ये संपूर्णपणे टीव्ही आता बंद पडले आहे.
kiev tv getting destroyed pic.twitter.com/FKvTM9bPNX
— ian bremmer (@ianbremmer) March 1, 2022
रशियन सैनिकांच्या हल्ल्याचा भीषण व्हिडीओ समोर आला आहे. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली का, याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. कीव शहरात रशियन सैन्याने जोरदार हल्ला चढवला आहे. लाखो रहिवासी हे युक्रेनमधून पलायन करत आहे.
Outro ângulo da explosão perto de uma torre de TV em Kiev. pic.twitter.com/fJeUxY0FoO
— Acom News TV - ANTV (@AcomNewsTV) March 1, 2022
दरम्यान, युद्धात प्रतिबंधित असलेल्या व्हॅक्यूम बॉम्बचा (Vacuum bomb on Urkraine) वापर केला आहे असा दावा करण्यात आला आहे. युक्रेनच्या राजदुतांनी म्हटलं, रशियाने सोमवारी व्हॅक्यूम बॉम्बचा (Vacuum Bomb) वापर केला, ज्यावर जिनिव्हा करारानुसार बंदी आहे. व्हॅक्यमु बॉम्बला सर्वात मोठा बॉम्ब म्हणजेच फादर ऑफ ऑल बॉम्ब असंही म्हटलं जातं. या बॉम्ब हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये मोठा विध्वंस झाला असल्याचं बोललं जात आहे. त्याच दरम्यान बॉम्ब हल्ल्याचा एक व्हिडीओ सुद्धा समोर आला आहे. असं म्हटलं जात आहे की, रशियाने युक्रनेविरुद्धच्या युद्धात थर्मोबॅरिक शस्त्रांचा (Thermobaric Weapon) वापर केला. थर्मोबॅरिक शस्त्रांत पारंपारिक दारूगोळा वापरला जात नाही. हे उच्च-दाब असलेल्या स्फोटकांनी भरलेले असतात. शक्तिशाली स्फोट घडवण्यासाठी याचा वापर केला जातो.