जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / कोरोनाची दहशत वाढली! इटलीमध्ये आतापर्यंत 3405 लोकांचा मृत्यू, लष्काराचे जवान करत आहेत मृतांचे अंत्यसंस्कार

कोरोनाची दहशत वाढली! इटलीमध्ये आतापर्यंत 3405 लोकांचा मृत्यू, लष्काराचे जवान करत आहेत मृतांचे अंत्यसंस्कार

कोरोनाची दहशत वाढली! इटलीमध्ये आतापर्यंत 3405 लोकांचा मृत्यू, लष्काराचे जवान करत आहेत मृतांचे अंत्यसंस्कार

कोरोनाचं नवं केंद्र झालं इटली. प्रत्येक मिनीटाला इटलीमध्ये एकाचा मृत्यू होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मिलान, 20 मार्च : खतरनाक कोरोनाव्हायरसने इटलीमध्ये धुमशान घातले आहे. इटलीमध्ये मृत्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या चीनपेक्षा इटलीमध्ये मृतांची संख्या जास्त आहे. एकाच दिवशी इटलीमध्ये 427 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला. यामुळे इटलीमधील मृतांचा आकडा 3405 झाला आहे. तर, 3245 लोकांची परिस्थिती चिंताजनक आहे. कोरोनाचा कहर पाहता 12 मार्च पासून इटलीमध्ये लॉकडाउन सुरू आहे, आता हाच लॉकडाऊन अनिश्चित काळासाठी वाढविण्यात आला आहे. इटलीमधील जवळपास सर्व लोकांना त्यांच्या घरी रहाण्यास सांगितले गेले आहे. सध्या कोरोनामुळे 41 हजाराहून अधिक लोक संक्रमित आहेत. आतापर्यंत जगभरात कोरोनामधून 2 लाख 20 हजार 000 संक्रमणाची नोंद झाली असून 9 हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. वाचा- धक्कादायक! उल्हासनगरमधील कोरोनाग्रस्त महिला आली होती 1500 लोकांच्या संपर्कात लष्काराला करावे लागत आहेत अंत्यसंस्कार इटलीमधील वुहान म्हणून सध्या ओळखल्या जाणाऱ्या बेर्गमोमध्ये चिंतेचे वातावरण आहे. बेर्गमोमध्ये सर्वात जास्त कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दर मिनिटाला कोरोनामुळे या शहरात एकाचा मृत्यू होत आहे. मृतांची संख्या एवढी वाढली आहे की, लष्कराच्या जवानांना मृतांचे अंत्यसंस्कार करावे लागत आहे. वाचा- ‘कोरोनाव्हायरस पॉर्न ते गो कोरोना’,COVID19 इतक्याच वेगाने VIRAL झाल्या या गोष्टी

जाहिरात

वाचा- पाकने उघडली कोरोनाची नर्सरी! आतापर्यंतचा सर्वात भयंकर VIDEO इटलीमध्ये अनिश्चितकाळासाठी लॉकडाउन इटलीने हे संकट टाळण्यासाठी सर्व व्यवसाय, शाळा, विद्यापीठे बंद केले आहे. इटलीचे पंतप्रधान ज्युसेप्पे कॉन्टे यांनी, लॉकडाऊनमुळे संपूर्ण यंत्रणा उध्वस्त होण्यापासून वाचली आहे, असे सांगितले. तसेच, लॉकडाउन उचलल्यानंतरही आपण त्वरित परिस्थितीत परत येऊ शकत नाही. या रोगाचा नाश इतका उच्च आहे की 60 दशलक्ष लोकसंख्या असलेल्या इटलीने आता मृत्यूच्या तुलनेत 20 पट जास्त लोकसंख्या असलेल्या चीनला मागे टाकले आहे. कोरोनाची सुरुवात चीनच्या वुहान शहरातून करण्यात आली होती पण आता तेथे कोणतेही नवीन प्रकरण समोर आलेली नाहीत. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की इटली जगातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या आहे आणि मृत्यू झालेल्यांपैकी 87% लोक 70 वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत. वाचा- कोरोनाव्हायरसमुळे घरात बंदिस्त, असा रहा तणावमुक्त चिनी कनेक्शनमुळे इटली हैराण इटलीचा उत्तर भाग फॅशन आणि कपड्यांच्या उद्योगामुळे ओळखला जातो. गुची आणि प्राडा या नामांकित जागतिक ब्रँडचा हा आधार आहे. चीन जगाला स्वस्त उत्पादन देत असल्याने इटलीतील बहुतेक फॅशन ब्रँड चीनशी जवळून काम करत आहेत. ही इटालियन फॅशन हाऊस चिनी कामगारांना स्वस्त कामगार म्हणून कामावर घेतात, त्यातील बहुतेक वुहानचे नागरिक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात