इस्लामाबाद, 20 मार्च : कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) सारे जग सध्या हैराण आहे. कोरोना विषाणूची लागण रोखण्यासाठी सर्व बाधित देश प्रयत्न करत आहेत. या आजारावर उपाय म्हणून सावधगिरी बाळगण्यासाठी सरकारने त्यांच्या देशातील नागरिकांकडून सहकार्य मागितले आहे. पाकिस्तान देखील या आजार वेगाने पसरत आहे. रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लोकांना अलग ठेवण्यासाठी पाकिस्तानमध्ये क्वारंटाईन केंद्र उभारण्यात आली आहेत. मात्र या केंद्राची अवस्था इतकी दयनीय आणि वाईट आहे की संसर्ग थांबण्याऐवजी आणखी पसरू शकतो.
पाकिस्तानमध्ये या देखरेख केंद्रांवर स्वच्छताविषयक उपायांची प्रचंड कमतरता आहे. क्वारंटाईन सेंटरचे निकृष्ट स्थितीतील अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
इराणमध्ये कोरोना पसरल्यानंतर तेथील स्थायिक पाक नागरिक घरी पोहचले आहेत आणि सरकारने या नागरिकांना वेगळे ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी त्यांना वाईट परिस्थितीत असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत संक्रमित व्यक्तींकडून हा रोग पसरण्याची शक्यता आहे. या केंद्रांमध्ये वैद्यकीय व स्वच्छता सुविधा नसल्याचे सांगण्यात येत आहे. इराणमधून मोठ्या संख्येने लोक पाकिस्तानमध्ये पोहोचत आहेत.
This is not #SocialDistancing or a #Quarantine the PM has no clue what crisis management is. For the sake of Pakistan please act with proper knowledge. Time is of easence here. pic.twitter.com/gDEMPZzk2N
— Syed Awais Shah (@awais_shah01) March 18, 2020
नागरिकांच्या देखरेखीसाठी पाकिस्तान सरकारने इराणच्या सीमेवर तफ्तानमध्ये क्वारंटाईन सेंटर बांधले आहे. येथे ठेवलेल्या लोकांनी या केंद्राचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये या केंद्रात क्षमतेपेक्षा जास्त लोकांना ठेवले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या केंद्राने हजारो लोकांचा जीव धोक्यात टाकला आहे.
Filthy, squalid conditions in Taftan quarantine camp where Pakistan is housing its pilgrims returning from Iran. No medicines, no food, no doctors. Inadequate bathrooms, stinking latrines.And Pak health minister @zfrmrza was lecturing India on how to attend #corona threat in J&K pic.twitter.com/f8Pzu03bq3
— Vikas Saraswat (@VikasSaraswat) March 16, 2020
या व्हिडीओमध्ये लोक जमिनीवर आणि कॉरिडॉरमध्ये झोपलेले दिसत आहेत. विशेष म्हणजे पाकिस्तान सरकारने मोकळ्या जागेत हे केंद्र बांधले. सर्वात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे की पाकिस्तान सरकारने निरोगी लोकांना इराणमधून आलेल्या आजारी लोकांपासून अद्याप वेगळे केलेले नाही.
कोरोनामुळे 16 मार्चपासून तफ्तान सीमा बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे इराणच्या यात्रेसाठी गेलेले पाकिस्तानी नागरिक आता आपल्या देशात परतत आहेत. पाकिस्तान सरकार तेथून आलेल्या नागरिकांवर दोन आठवडे पाळत ठेवणार आहे. पाकिस्तानमध्ये बुधवारी कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या किमान 243 पर्यंत वाढेल. दक्षिण आशियातील देशांमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे.