धक्कादायक! उल्हासनगरमधील कोरोनाग्रस्त महिला आली होती 1500 लोकांच्या संपर्कात

धक्कादायक! उल्हासनगरमधील कोरोनाग्रस्त महिला आली होती 1500 लोकांच्या संपर्कात

देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात हा आकडा 49वर पोहचला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 मार्च : कोरोनाने भारतात शिरकाव केल्यानंतर या विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात हा आकडा 49वर पोहचला आहे. गुरुवारी राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये काही करोनाग्रस्त रुग्ण अढळल्याने करोनाग्रस्तांचा आकडा अचानक वाढला. यात उल्हासनगरमधील एका ४९ वर्षीय महिलेचाही समावेश आहे. आता या महिलेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

उल्हासनगरमध्ये सापडलेली ही करोनाग्रस्त महिला काही दिवसांपूर्वीच शहरातील एका सत्संग कार्यक्रमाला उपस्थित होती, अशी माहिती पालिकेच्या तपासात समोर आली आहे. उल्हासनगरमधील या करोनाग्रस्त महिलेला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सध्या पालिकेच्या वतीने घेण्यात येत आहे.

दरम्यान, ही महिला दुबईहून काही दिवसांपूर्वी भारतात आली होती. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्यांचीही चाचणी करण्यात आली आहे. तर, या महिलेच्या कुटुंबियांना वेगळे ठेवण्यात आले आहे. मात्र आता या महिलेचा संपर्क 1500 लोकांशी आलेला असल्यामुळं सध्या उल्हासनगरमध्ये भीतीचे वातावरण आहे. संबंधित महिलेने 8 मार्च रोजी उल्हासनगरमधील एका संत्संगाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती.

कोरोनाग्रस्त महिला 4 मार्च रोजी दुबईहून भारतात आली होती. त्यानंतर 8 मार्च रोजी तिने या संत्संगाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर तब्येत खालवल्यमुळं तिची चाचणी करण्यात आली. या चाचणीत महिलेला करोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. मागील 15-20 दिवसांत या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सध्या पालिका घेत आहे. मात्र 1500 लोकांच्या संपर्कात ही महिला आल्यामुळे खळबळ माजली आहे. अद्याप पालिकेला या लोकांचा शोध घेता आला नाही आहे.

First published: March 20, 2020, 9:18 AM IST

ताज्या बातम्या