VIDEO पाकिस्तानी पत्रकाराने विचारलं, चर्चा कधी? भारतीय मुत्सद्दी अकबरुद्दीन यांनी असं बसवलं गप्प!

UN Security Council च्या बंद दाराआड झालेल्या बैठकीनंतर भारताचे दूत सैद अकबरुद्दीन यांनी एक पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानच्या पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केल्यावर अकबरुद्दीन यांनी काय केलं पाहा...

News18 Lokmat | Updated On: Aug 17, 2019 04:53 PM IST

VIDEO पाकिस्तानी पत्रकाराने विचारलं, चर्चा कधी? भारतीय मुत्सद्दी अकबरुद्दीन यांनी असं बसवलं गप्प!

संयुक्त राष्ट्रसंघ, 17 ऑगस्ट : पाकिस्तानने चीनला हाताशी धरून काश्मीरचा विषय UN Security Council पर्यंत नेला खरा, पण त्यांचा डाव फसल्याचं कालच्या बातम्यांवरून स्पष्ट आहे. संयुक्त राष्ट्रसंघात ( UN )भारताचे दूत सैद अकबरुद्दीन यांनी यासंदर्भात माहिती दिली. UN Security Council च्या बंद दाराआड झालेल्या बैठकीनंतर अकबरुद्दीन यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात भारताची बाजू स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत अनेक पाकिस्तानी पत्रकार सहभागी होते. ते एकामागोमाग एक प्रश्न सैद अकबरुद्दीन यांना विचारत होते.त्या सर्वांना अत्यंत थंड डोक्याने सामोरं जात "काश्मीरप्रश्नीचा सर्व तणाव हा द्विपक्षीय चर्चा करूनच सोडवता येईल. पाकिस्तान जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे" , असं अकबरुद्दीन यांनी स्पष्ट केलं. पाकिस्तानला इशारा देताना कडक शब्दांत, "दहशतवाद थांबवा तरच संवाद सुरू होईल. आम्ही दोन देशांमध्ये झालेल्या शिमला कराराला बांधील आहोत. पण पाकिस्तान द्विपक्षीय करारातले मुद्दे पाळण्यात अयशस्वी झाल्याची स्पष्टोक्ती त्यांनी केली."

पाकिस्तानबरोबरचा संवाद कधी सुरू होईल, असं विचारल्यावर अकबरुद्दीन यांनी थेट प्रश्न विचारणाऱ्याशी शेकहँड केला आणि आमच्या बाजूने संवाद सुरू झालेला आहे, असं सांगितलं.जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार केल्यानंतर पाकिस्तान वारंवार याप्रकरणी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःच्या बाजूनं मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकनं हा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही (UNSC)नेला. पण UNSCचे अध्यक्ष पोलंडकडून स्पष्ट शब्दांत पाकची कानउघाडणी करण्यात आली. या समस्येचं निराकरण द्विपक्षीय स्तरावरच होऊ शकते, असं पाकला सांगण्यात आलं.

संबंधित वृत्त - राजनाथ सिंह यांच्या अण्वस्त्र वापराविषयीच्या गर्भित इशाऱ्याने खळबळ!

पाकिस्तानबरोबरचा संवाद कधी सुरू होईल, असं विचारल्यावर अकबरुद्दीन यांनी थेट प्रश्न विचारणाऱ्याशी शेकहँड केला आणि आमच्या बाजूने संवाद सुरू झालेला आहे, असं सांगितलं. अनेक पाकिस्तानी पत्रकारांनी सैद यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. त्यांना अशाच पद्धतीने उत्तरं देत, आता पाकिस्तानी प्रश्न बरेच झाले, इतरही देशांचे प्रश्न घेतो, असा टोमणाही अकबरुद्दीन यांनी मारला. नेमकं काय झालं या पत्रकार परिषदेत.. पाहा व्हिडिओ...

UN Security Council च्या बंद दाराआड झालेल्या बैठकीचे तपशील हळूहळू समोर येऊ लागले आहेत. वास्तविक भारत आणि पाकिस्ताना दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना या गुप्त बैठकीत प्रवेश नव्हता. हे दोन्ही देश संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे परमनंट मेंबर नाहीत. पण अमेरिका आणि इतर युरोपीय देशांच्या जोडीला चीनला या परिषदेचं सदस्यत्व मिळालेलं आहे. या बैठकीत काश्मीरप्रश्नी नाक खुपसण्याचा पाकिस्तान आणि चीनचा प्रयत्न पुरता हाणून पडला आणि भारताचा आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत विजय झाला. ॉ

हे वाचा - परदेशात फिरायला जायचे आहे? भूटानपासून करा सुरुवात; ही आहेत कारणं!

काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तातडीने बैठक बोलवावी असा तगादा पाकिस्तानने त्यांचं मित्रराष्ट्र असलेल्या चीनच्या मदतीने लावून धरला होता. भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला, तो पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची बदनामी करण्याच्या उद्देशाने आणि भारताला अडचणीत आणण्यासाठी पाकिस्तानने पूर्ण प्रयत्न केले. पण त्यात या देशाला अपयश आलं. सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानचा डाव उघडा पडला. उलट पाकपुरस्कृत दहशतवादामुळे काश्मिरींना विकासापासून दूर दहशतीच्या छायेत कसं जगावं लागलं हे पटवून देण्यात भारतच यशस्वी झाला, असं चित्र आहे.

काश्मीरला विशेष दर्जा काढून घेतल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे, हा भारताचा युक्तिवाद बहुतेक देशांनी मान्य केला. काश्मीरविषयीचा तणाव दोन्ही देशांनी संवादाच्या माध्यमातून सोडवावा, असं सुरक्षा समितीच्या बैठकीत ठरलं. UN security Council या दोन्ही देशांमधल्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे, असंही त्यांनी ठरवलं.

सुरक्षा समितीचे सभासद असणाऱ्या ब्रिटन, फ्रान्स या देशांनी भारताला अगोदरच पाठिंबा व्यक्त केला आहे. फक्त चीनने पाकिस्तानची बाजू लावून धरली होती.

UN मध्ये भारताचा मोठा विजय; काश्मीरप्रश्नी नाक घालणारा पाक आपटला तोंडावर

VIDEO :...'ते' पक्षासाठी हानीकारक, खडसेंचा भाजपला घरचा आहेर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2019 04:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...