राजनाथ यांच्या गर्भित इशाऱ्याने खळबळ! 'गरज पडली तर अण्वस्त्र प्रथम न वापरण्याच्या धोरणावर पुनर्निणय घेऊ'

राजनाथ यांच्या गर्भित इशाऱ्याने खळबळ! 'गरज पडली तर अण्वस्त्र प्रथम न वापरण्याच्या धोरणावर पुनर्निणय घेऊ'

पाकिस्तानशी संबंध तणावपूर्ण होत असतानाच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज एक महत्त्वपूर्ण इशारा दिला.

  • Share this:

पोखरण (राजस्थान), 16 ऑगस्ट : पाकिस्तानशी संबंध तणावपूर्ण होत असतानाच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज एक महत्त्वपूर्ण इशारा दिला. भारत आपल्या अण्विक शस्त्रास्त्रांसंदर्भातल्या धोरणाचा पुनर्विचार करू शकतो, असं ते म्हणाले. त्यांच्या या इशाऱ्याने खळबळ उडाली आहे. भारताची अण्वस्त्र नीती प्रथम ही विनाशक अस्त्र वापरायची नाहीत अशी आहे. इतकी वर्षं आमची हीच नीती होती. पण भविष्यात गरज पडली तर हे धोरण आम्ही बदलू शकतो, असं राजनाथ पोखरणमध्ये म्हणाले.

याच जागी 1998 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली 5 अण्विक चाचण्या यशस्वी झाल्या होत्या. वाजपेयींच्या पहिल्या स्मृतिदिनाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पोखरणमध्ये होती.

संबंधित बातम्या- 'प्राण्यांसारखं पिंजऱ्यात ठेवलं', मुफ्तींच्या मुलीचं अमित शहांना पत्र

माजी पंतप्रधान वाजपेयींना श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांनी आपल्या अण्वस्त्रविषयक धोरणाविषयी माहिती दिली.

नो फर्स्ट यूज

नो फर्स्ट यूज (NFU) या अण्वस्त्रविषयक धोरणाचा अर्थ आहे पहिल्यांदा अण्वस्त्रांचा वापर न करणं. भारताने या धोरणाचा अवलंब केला आहे. 1998 मध्ये पोखरण 2 चे अणुस्फोट केल्यानंतर ही चाचणी यशस्वी झाली, तेव्हा प्रथम भारताने ही घोषणा केली होती. शस्त्रूराष्ट्राविरोधात आम्ही प्रथम या विनाशक अस्त्रांचा वापर करणार नाही, असं हे धोरण सांगतं.

मोदींचाही होता पाठिंबा

NFU या अण्वस्त्र धोरणाला पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात पाठिंबाच दिला होता. 2014 मध्ये मोदी पहिल्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले, तेव्हा त्यांनी याच धोरणाचा पुनरुच्चार केला होता. त्यानंतर आज पहिल्यांदा संरक्षण मंत्र्यांनी या धोरणाचा पुनर्विचार होऊ शकतो, असा इशारा दिला.

------------------------------

VIDEO : कलम 370 रद्द केल्यानंतर सरसंघचालकांची वाढवली सुरक्षा

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: August 16, 2019, 4:23 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading