नवी दिल्ली, 17 ऑगस्ट: पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूटान दौऱ्यावर आहेत. PM मोदींच्या दौऱ्यात भारत आणि भूटान या दोन्ही देशांच्या दरम्यान 10 एमओयूवर स्वाक्षरी होणार आहे. भारत सरकारच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणानुसार भूटान हा एक महत्त्वाचा देश आहे. मोदींनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात देखील शेजारी प्रथम या धोरणानुसार परदेशी दौऱ्याची सुरूवात भूटानपासूनच सुरू केली होती. आता दुसऱ्यांचा सत्ता मिळाल्यानंतर देखील त्यांनी भूटानपासूनच परदेशी दौऱ्याची सुरुवात केली. मोदींच्या या परदेशी दौऱ्या प्रमाणे जर तुम्ही देखील विदेशात फिरण्यासाठी जाणार असाल तर त्याची सुरुवात भूटानपासून सुरू करू शकता. परदेशी दौऱ्याची सुरूवात भूटानपासूनच का करावी जाणून घ्या… भूटानच का? - भारताच एक चांगला शेजारी देश - भूटान हा भारत आणि चीन सीमेवरील एक सुंदर देश आहे. या देशाला जगातील सर्वात सुंदर देश असे देखील म्हटले जाते. - भूटानकडे हवाई दल नाही. या देशाची हवाई सुरक्षा भारतीय हवाई दलाकडे आहे. - भूटान हा एक सर्वात समाधानी देश असल्याचे मानले जाते - या देशात जाण्यासाठी पासपोर्ट अथवा व्हिसाची गरज लागत नाही कस जाल भूटाला जाण्यासाठी दोन पर्याय आहेत. पहिला म्हणजे तुम्ही हवाई मार्गे जाऊ शकता आणि दुसरा म्हणजे रस्त्याच्या मार्गाने भूटानला जाणे शक्य आहे. रस्त्याने भूटानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी भारत आणि भूटान सीमेवर असलेल्या फुनशीलिंग येथून टूरिस्ट परमिट घ्यावे लागते. यासाठी तुम्हाला तुमजे पासपोर्ट अथवा मतदान कार्ड आणि दोन पासपोर्ट साइज फोटो देणे आवश्यक ठरते. भारत आणि भूटानच्या चलनाची किमत समान आहे. त्यामुळे भारतात एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठी तुम्हाला इतका खर्च येतो इतकाच खर्च भूटानमध्ये देखील येईल. भूटानमध्ये कोठे भेट द्याल - थिम्पु - पारो - फुएन्त्शोलिंग - बुमथां - बोंगईगाव - कोकराझार - जलदापारा - नलबाडी डॉन आहे का तू? पोलिसांनी तरुणाला पट्ट्याने झोड-झोडपलं, VIDEO व्हायरल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.