जाहिरात
मराठी बातम्या / देश / UN मध्ये भारताचा मोठा विजय; kashmir प्रश्नी नाक खुपसणारा पाकिस्तान आपटला तोंडावर

UN मध्ये भारताचा मोठा विजय; kashmir प्रश्नी नाक खुपसणारा पाकिस्तान आपटला तोंडावर

UN मध्ये भारताचा मोठा विजय; kashmir प्रश्नी नाक खुपसणारा पाकिस्तान आपटला तोंडावर

UN Security Council च्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत भारताचा आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत विजय झाला आहे आणि पाकिस्तान- चीन तोंडावर आपटले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

संयुक्त राष्ट्र, 16 ऑगस्ट : UN Security Council च्या बंद दाराआड झालेल्या बैठकीचे तपशील हळूहळू समोर येऊ लागले आहेत.  या बैठकीत काश्मीरप्रश्नी नाक खुपसण्याचा पाकिस्तान आणि चीनचा प्रयत्न पुरता हाणून पडला आहे आणि भारताचा आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीत विजय झाला. काश्मीर प्रश्नी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने तातडीने बैठक बोलवावी असा तगादा पाकिस्तानने त्यांचं मित्रराष्ट्र असलेल्या चीनच्या मदतीने लावून धरला होता. भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याचा निर्णय घेतला, तो पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची बदनामी करण्याच्या उद्देशाने आणि भारताला अडचणीत आणण्यासाठी पाकिस्तानने पूर्ण प्रयत्न केले. पण त्यात या देशाला अपयश आलं. सुरक्षा परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानचा डाव उघडा पडला. उलट पाकपुरस्कृत दहशतवादामुळे काश्मिरींना विकासापासून दूर दहशतीच्या छायेत कसं जगावं लागलं हे पटवून देण्यात भारतच यशस्वी झाला, असं चित्र आहे.

जाहिरात

वास्तविक भारत आणि पाकिस्ताना दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना या गुप्त बैठकीत प्रवेश नव्हता. हे दोन्ही देश संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे परमनंट मेंबर नाहीत. पण अमेरिका आणि इतर युरोपीय देशांच्या जोडीला चीनला या परिषदेचं सदस्यत्व मिळालेलं आहे. संबंधित - जम्मू काश्मीरमध्ये सैन्याला High Alert; शत्रू करू शकतो हल्ला पाकिस्तानने चीनला हाताशी धरून काश्मीरचा विषय UN Security Council पर्यंत नेला. पण त्यांचा डाव फसल्याचं वृत्त आहे. संयुक्त राष्ट्रसंघात UN भारताचे दूत सैद अकबरुद्दीन यांनी यासंदर्भात माहिती दिली. “काश्मीरप्रश्नीचा सर्व तणाव हा द्विपक्षीय चर्चा करूनच सोडवता येईल. पाकिस्तान जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे” , असं ते म्हणाले. पाकिस्तानला इशारा देताना कडक शब्दांत, “दहशतवाद थांबवा तरच संवाद सुरू होईल”, असा इशारा त्यांनी दिला. आम्ही दोन देशांमध्ये झालेल्या शिमला कराराला बांधील आहोत. पण पाकिस्तान द्विपक्षीय करारातले मुद्दे पाळण्यात अयशस्वी झाल्याची स्पष्टोक्ती त्यांनी केली.

जाहिरात

काश्मीरला विशेष दर्जा काढून घेतल्याने विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे, हा भारताचा युक्तिवाद बहुतेक देशांनी मान्य केला. काश्मीरविषयीचा तणाव दोन्ही देशांनी संवादाच्या माध्यमातून सोडवावा, असं सुरक्षा समितीच्या बैठकीत ठरलं. UN security Council या दोन्ही देशांमधल्या परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे, असंही त्यांनी ठरवलं. संबंधित बातमी - ‘प्राण्यांसारखं पिंजऱ्यात ठेवलं’, मुफ्तींच्या मुलीचं अमित शहांना पत्र सुरक्षा समितीचे सभासद असणाऱ्या ब्रिटन, फ्रान्स या देशांनी भारताला अगोदरच पाठिंबा व्यक्त केला आहे. फक्त चीनने पाकिस्तानची बाजू लावून धरली होती. पाकिस्तानबरोबरचा संवाद कधी सुरू होईल, असं विचारल्यावर अकबरुद्दीन यांनी थेट प्रश्न विचारणाऱ्याशी शेकहँड केला आणि आमच्या बाजूने संवाद सुरू झालेला आहे, असं सांगितलं.

जाहिरात

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार केल्यानंतर पाकिस्तान वारंवार याप्रकरणी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःच्या बाजूनं मदत मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकनं हा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतही (UNSC)नेला. पण UNSCचे अध्यक्ष पोलंडकडून स्पष्ट शब्दांत पाकची कानउघाडणी करण्यात आली. या समस्येचं निराकरण द्विपक्षीय स्तरावरच होऊ शकते, असं पाकला सांगण्यात आलं.

देशाला मिळणार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ : ‘या’ व्यक्तीचं नाव आहे सर्वात पुढे

भारताविरोधात गरळ ओकण्यासाठी PAK पंतप्रधान इम्रान खानची ‘काळी’ नापाक हरकत 370 हटवल्यानंतरचा लडाखमधील स्वातंत्र्य दिन; पाहा BJP खासदाराच्या डान्सचा VIDEOVIDEO : राणेंचा शिवसेना सोडण्याचा निर्णय आणि ‘त्या’ 2 चिठ्ठ्या, शरद पवारांची तुफान टोलेबाजी

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात