• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • असा देश जिथे 3000 रुपये किलोने होतेय केळ्यांची विक्री, गरीबीविषयी बोलल्यास थेट घातल्या जातात गोळ्या

असा देश जिथे 3000 रुपये किलोने होतेय केळ्यांची विक्री, गरीबीविषयी बोलल्यास थेट घातल्या जातात गोळ्या

उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशहा (Dictator) किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या विक्षिप्तपणाचे, क्रूरतेचे किस्से जगभरात प्रसिद्ध आहेत. साध्या कारणांवरून या देशात लोकांना सरळ गोळ्या घातल्या जातात. पण या देशातील गरीबीबाबत कुणीही बोलण्यास तयार नाही आहे.

  • Share this:
मुंबई, 19 जून: उत्तर कोरियाचे (North Korea) हुकूमशहा (Dictator) किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्या विक्षिप्तपणाचे, क्रूरतेचे किस्से जगभरात प्रसिद्ध आहेत. साध्या कारणांवरून या देशात लोकांना सरळ गोळ्या घातल्या जातात. अण्वस्त्र सज्जता, शस्त्रसाठा यावर भर देणाऱ्या किम जोंग उन याची इथे प्रचंड दहशत आहे. या देशाचा सर्वेसर्वा म्हणवून घेणाऱ्या या नेत्याला आपल्या देशातील दारिद्र्याविषयी बोललेलं आवडत नाही. चुकून कोणी याबद्दल काही बोललं तर त्या व्यक्तीला थेट गोळ्या घातल्या जातात.  कोरोना विषाणूची साथ (Coronavirus Pandemic) आणि वादळ यामुळे उत्तर कोरियाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून, मोठी टंचाई निर्माण झाली आहे. आपल्या देशातल्या दारिद्र्याविषयी (Poverty) कधीही न बोलणार्‍या या हुकूमशहाने स्वत:च आपल्या देशात अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. उत्तर कोरियामधील परिस्थिती इतकी भयाण झाली आहे, की सर्वांत स्वस्त फळ म्हणून ओळखली जाणारी केळी (Banana) तिथे आता 3000 रुपये किलो दराने विकली जात आहेत. काही भागात एका केळ्याची किंमत तब्बल 440 रुपयांवर पोहोचली आहे. देशाची राजधानी प्योंगयांगसह बर्‍याच भागात केळी याच दरानं विकली जात आहेत. उत्तर कोरियामध्ये तीन लाख लोक उपासमारीनं मरण पावले असून, परिस्थिती आणखीच गंभीर होत आहे. हे वाचा-सर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच महिलांसोबत होतं... गरीबी असल्याचं सांगणं हा गुन्हा इथले लोकं भुकेनं मरत असले तरी गरीबीबद्दल बोलण्याची हिंमत करत नाहीत. या देशात गरिबांचे फोटो काढणे (Taking Pictures of Poors is Crime) आणि प्रसिद्ध करणं हा गुन्हा आहे. अशा परिस्थितीत लोकांनी केळी खाल्ली नाहीत तरी चालेल; पण ती विकत घेण्यासाठी पैसे नाहीत हे सांगायचं नाही, अशी स्थिती आहे. सरकार ठरवतं पोशाख आणि केशरचना या देशातल्या लोकांनी काय घालायचं, काय नाही हेदेखील हा हुकूमशहा ठरवतो.  उदाहरणार्थ, उत्तर कोरियामध्ये निळी जीन्स घालण्यास बंदी आहे. कारण तो अमेरिकन वेश मानला जातो. एवढंच नाही, तर लोकांना सरकारनं ठरवलेल्या 23-24 केशरचनांपैकी निवड करून तशी केशरचना करावी लागते. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही आपले केसही कापू शकत नाही. एक पछाडलेलं शहर उत्तर कोरियाबाबतच्या काही धक्कादायक गोष्टींपैकी एक म्हणजे किजोंग डांग नावाची मॉडेल सिटी (Model City). उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर हे शहर तयार करण्यात आलं आहे. असं म्हणतात, की इथं कोणीही राहत नाही, केवळ दक्षिण कोरियाला चिथावण्यासाठी हे शहर निर्माण करण्यात आलं आहे. हे वाचा-विश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO कालगणना स्वतंत्र संपूर्ण जगात वर्ष 2021 सुरू आहे; उत्तर कोरियामध्ये मात्र वर्ष 109 सुरू आहे. कारण इथलं कॅलेंडर माजी हुकूमशहा किम इल-सुंग यांच्या जन्मतारखेवर म्हणजेच 15 एप्रिल 1912 वर आधारित आहे. हे कॅलेंडर त्याच्या जन्मानंतरच सुरू झालं आहे. चूक एकाची; शिक्षा तीन पिढ्यांना किम जोंग उन यांच्या काही विचित्र नियमांपैकी एक म्हणजे अगदी लहानात लहान चुकीचीही भयानक शिक्षा भोगावी लागते. केवळ चुकलेल्यांनाच शिक्षा दिली जात नाही; तर त्या व्यक्तीच्या पुढच्या तीन पिढ्यांना ती शिक्षा भोगावी लागते. गोळ्या घालून ठार करणं, भुकेल्या कुत्र्यांसमोर टाकणं अशा शिक्षा इथं सर्रास दिल्या जातात. चित्रपटासाठी दिग्दर्शकाचं अपहरण 1990 पासून या देशात शिक्षकांसाठी एक विचित्र नियम करण्यात आला आहे. तो म्हणजे इथल्या सर्व शिक्षकांना अकॉर्डियन हे हार्मोनियमसारखे वाद्य वाजवता येणं आवश्यक आहे. या देशातील जवळपास प्रत्येक नागरिकाला हे वाद्य कसं वाजवायचं ते माहीत आहे. हुकूमशहा किम जोंग याच्या विक्षिप्तपणाचा एक किस्सा म्हणजे एकदा त्यांनी उत्तर कोरियाची स्तुती करणारा चित्रपट निर्माण करण्यासाठी एका दिग्दर्शकाचं अपहरण केलं होतं. सुदैवानं तो दिग्दर्शक कसा तरी पळून जाण्यात यशस्वी ठरला.
Published by:Janhavi Bhatkar
First published: