जगातील सर्वात घाणेरड्या विमानसेवेचे फोटो आले समोर, प्रवासादरम्यानच होते महिलांसोबत छेडछाड

विमान प्रवासादरम्यान एका मुलीसोबत गैरवर्तन झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या गैरवर्तनाबाबतचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडीयावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

विमान प्रवासादरम्यान एका मुलीसोबत गैरवर्तन झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या गैरवर्तनाबाबतचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडीयावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

  • Share this:
नवी दिल्ली 19 जून : विमानप्रवास (Travel) हे अनेकांचं स्वप्न असतं. अनेक लोक विविध कारणांनी विमान प्रवास करतात. या प्रवासादरम्यान अनेकांना विमान कंपनीकडून मिळणाऱ्या सेवेबाबत बरे-वाईट अनुभव येत असतात. विमान प्रवासादरम्यान एका मुलीसोबत गैरवर्तन झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या गैरवर्तनाबाबतचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडीयावर (Social Media) व्हायरल झाला आहे. सध्याच्या काळात प्रवासासाठी अनेक लोक विमानाला प्राधान्य देतात. कोरोना काळात (Corona) विमान प्रवास अधिक सुरक्षित समजला जात आहे. तसंच या काळात अनेक निर्बंधांमुळे तिकिटांचे दरदेखील कमी आहेत. तिकिटाचे दर कमी असल्याने एका मुलीने अमेरिकेतल्या सर्वांत वाईट समजल्या जाणाऱ्या कंपनीच्या विमानाने प्रवास करण्यासाठी तिकीट बुक केलं. या मुलीचा विमानप्रवास एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरला. या मुलीच्या मागील सीटवर सुमारे 50 वर्ष वयाची एक व्यक्ती बसली होती. ही व्यक्ती आपल्याला अयोग्य पद्धतीने स्पर्श (Misbehave) करत असल्याचं त्या मुलीला जाणवलं. पहिल्यांदा या मुलीला वाटलं, की त्या व्यक्तीकडून चूक झाली असेल. परंतु, त्यानंतर ती व्यक्ती ही कृती जाणीवपूर्वक करत असल्याचं त्या मुलीच्या लक्षात आलं. त्यानंतर या मुलीने या प्रकाराचा व्हिडिओ बनवला आणि विमानाच्या क्रूकडे (Crew) याबाबत तक्रार केली. परंतु, त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट त्या मुलीलाच शांत राहण्याचा सल्ला देण्यात आला. एकाच वर्षात दोनवेळा दिवाळी-दसरा; या कंपनीतील कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा पगारवाढ कुटुंबासह करत होती प्रवास या मुलीचं नाव काय आहे, हे स्पष्ट झालं नाही. परंतु, टिकटॉकवर (Tik Tok) @mobilesushibar हे तिचं नाव दिसून आलं. ही तरुणी 17 जूनला आपल्या कुटुंबीयांसमवेत स्पिरिट एअरलाइन्सच्या विमानामधून (Spirit Airlines) कॅलिफोर्नियाला (California) जात होती. यावेळी तिने शेजारच्या प्रवाशाला विनंती करून विंडो सीट मिळवली. त्यानंतर कोणी तरी मागच्या बाजूने आपल्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचं त्या मुलीला जाणवलं. या मुलीने या कृत्याचा व्हिडिओ बनवला. या मुलीला मागच्या सीटच्या बाजूने कोणी तरी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसतं. VIDEO: महिलेच्या ड्रेसमध्ये शिरला उंदीर अन्..; पाहा भररस्त्यात घडलेली भयंकर घटना क्रूने केले दुर्लक्ष या मुलीने याबाबतचे पुरावे विमानातील क्रू मेंबर्सला (Crew Members) दाखवले. परंतु, ही बाब कोणीही गांभीर्याने घेतली नाही. उलट त्या मुलीलाच शांत राहा, असं सांगण्यात आलं. तिच्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही. त्यानंतर विमान लँड होताच त्या मुलीने या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल झाला. केवळ 24 तासांत या व्हिडिओला पाच लाख व्ह्यूज मिळाले. तसेच यावर अनेक लोकांनी विमान कंपनीबाबत नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या. स्पिरिट एअरलाइन्स ही जगातली सर्वांत वाईट विमान कंपनी समजली जाते. या कंपनीच्या विमानांमधून सामान चोरी होणं, विमानात गैरवर्तन होणं ही सर्वसामान्य बाब समजली जाते.
Published by:Kiran Pharate
First published: