• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • विश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO

विश्वविक्रम करण्यासाठी हवेत उडवली दुचाकी; पण झाला दुर्दैवी मृत्यू, पाहा VIDEO

VIRAL VIDEO: एका स्टंटमॅननं आपला जीव धोक्यात घालून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याला या स्टंटमुळे जीव (Death) गमवावा लागला आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 19 जून: धोकादायक स्टंट (Stunt) करणं काही लोकांचा छंद असतो. अशा प्रकारचा स्टंट करण्यासाठी ते आपल्या जीवाची बाजी लावायलाही मागे पुढे पाहत नाहीत. काही लोकं जागतिक विक्रम (world Record) करण्यासाठी अशाप्रकारचे स्टंट करत असतात. अशावेळी ते असं काही करतात ज्यावर आपल्यासारख्या सामान्य माणसाचा विश्वास देखील बसत नाही. पण असे धोकादायक स्टंट बर्‍याच वेळा जीवघेणं ठरू शकतं. अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका स्टंटमॅननं आपला जीव धोक्यात घालून विश्वविक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याला या घटनेत जीव (Death) गमवावा लागला आहे. संबंधित स्टंटमॅनचं नाव अ‍ॅलेक्स हार्विल (Alex Harvill) असून तो अमेरिकेच्या प्रसिद्ध स्टंटमॅन (stuntman) म्हणून ओळखला जातो. दुचाकी हवेत उडवून स्टंट करत असताना अपघात घडल्यानं त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. सराव करत असताना त्याचं निधन झालं आहे. हार्विल हा 351 फूट उंचावरून दुचाकी जंपचा सराव करत होता. हा सराव करत असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टनमध्ये सध्या सुरू असलेल्या मोसेस लेक एअरशोमध्ये विश्वविक्रम करण्यासाठी तो हा सराव करत होता. मात्र सराव करत असताना पहिल्याचं स्टंटमध्ये अ‍ॅलेक्सचा आपला तोल गेला आणि तो खाली कोसळला. यातचं त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अ‍ॅलेक्स हार्विलच्या मृत्यूचा हा हृदयद्रावक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये अ‍ॅलेक्स एका मोकळ्या शेतातून दुचाकी वेगाने घेऊन येत आहे. यानंतर त्यानं रॅम्पचा आधार घेऊन दुचाकी हवेत उडवली आहे. पण त्याला गंतव्य ठिकाणी पोहोचता आलं नाही. तो मातीच्या ठिगाऱ्यावर जोरात आदळला. या अपघातात 28 वर्षीय अ‍ॅलेक्सचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला आहे. हेही वाचा-Yuck! जिमध्ये 1 हजार किलोचं वजन उचललं आणि चड्डीतच XXX ; बॉडीबिल्डरचा VIDEO VIRAL या दुर्दैवी घटनेनंतर स्टंट पाहण्यासाठी गर्दी केलेल्या लोकांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. विशेष म्हणजे अ‍ॅलेक्स हार्विल याच्या नावावर अनेक जागतिक विक्रम आहेत. अ‍ॅलेक्स हार्विलनं 2012 मध्ये 'रॅम्प टू डर्ट' या क्रिडाप्रकारात 425 फूट अंतरची जंप मारून जागतिक विक्रम केला होता.
  Published by:News18 Desk
  First published: