ATMमधून पैसे नाही तर येणार तांदूळ, लॉकडाऊनमध्ये 'या' देशाने अशी केली सोय

ATMमधून पैसे नाही तर येणार तांदूळ, लॉकडाऊनमध्ये 'या' देशाने अशी केली सोय

लॉकडाऊनसारख्या परिस्थितीत लोकांना मोफत अन्नधान्य मिळावे, यासाठी या देशाने केलेली सोय सर्व देशांनी वापरली पाहिजे.

  • Share this:

हनोई, 15 एप्रिल : कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी बर्‍याच देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्याता आलाआहे. यामुळे अन्नधान्याचा तुटवढा तर निर्माण झालाच आहे, त्याचबरोबर लोकांना अन्नधान्य मिळेनासे झाले आहे. तर बर्‍याच लोकांना आपल्या नोकर्‍याही गमवाव्या लागल्या आहेत. अशा परिस्थितीत गरजू लोकांना मदत करण्यासाठी एका देशाने एक अनोखी सोय केली आहे. social distancing बरोबरच लोकांचा अन्न धान्याचा पुरवठा करण्यासाठी या देशांनं दिवसभर तांदूळ देण्याची सोय केली आहे.

लॉकडाऊनमध्ये लोकांना अन्नधान्याचा पुरवठा करणारा हा देश आहे व्हिएतनाम. येथे तांदूळ एटीएम अशी मशीन सुरू करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये खाण्याची समस्या लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे. यामुळे लोकं एटीएममधून बँकेच्या एटीएमप्रमाणे तांदूळ विनामूल्य काढू शकेल. हे तांदळाचे एटीएम 24 तास सुरू राहणार आहे. लॉकडाऊनच्या वेळी गरजू लोकांना मदत करण्यासाठी 'राईस एटीएम' मशीन बसविण्याकरिता व्हिएतनाममधील एका व्यावसायिकाने पुढाकार घेतला आहे. हा उपक्रम देखील खूप प्रभावी असल्याचे सिद्ध होत आहे.

वाचा-'अन्न द्या, नाहीतर गावी जाऊ द्या'; लॉकडाऊन वाढवण्याच्या घोषणेनंतरचे PHOTO

व्हिएतनाममध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची 262 रुग्ण आहेत. सुदैवाने येथे अद्याप एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. परंतु 31 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. लोकांनीही सामाजिक अंतर राखण्यास सुरवात केली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे छोटे व्यवसाय ठप्प झाले आहेत. यामुळे अन्नधान्य विकत घेण्यासाठी लोकांकडे पैसे नाही आहेत.

वाचा-VIDEO : रस्त्यावर सांडलेलं दूध जेव्हा माणूस आणि कुत्रे एकाचवेळी पितात तेव्हा...

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, लॉकडाऊनमुळे नोकरी गमावलेल्या नुगेन थी ले ले नावाच्या महिलेचा नवरा आहे. त्यांनी सांगितले की, 'राईस एटीएम' खूप उपयुक्त ठरत आहे. तांदळाची एक पोती एका दिवसासाठी पुरेसे आहे. तीन मुलांची आई नुग्येन सांगते की आम्हाला फक्त जेवणाची गरज आहे. आपले शेजारी कधीकधी आम्हाला काही उरलेले अन्न देतात, अन्यथा आम्ही नूडल्स खाऊन जगतो. या तांदळाच्या एटीएममधून दीड किलो तांदूळ एकावेळी दिला जातो. हे एटीएम खासकरुन अशा लोकांसाठी उपयुक्त ठरत आहेत जे रस्त्यावर विक्रेते, घरकाम, लॉटरीचे तिकिट विकून पैसे कमवतात.

वाचा-'तोड़ देंगे तुम्हारे शरीर का कोना कोना, मगर...', पोलिसांचा हा VIDEO पाहाच

वाचा-LOCKDOWN 2-घरबसल्या खरेदी करा स्वस्त सोनं,20 एप्रिलपासून मोदी सरकार करणार विक्री

First published: April 15, 2020, 7:23 AM IST

ताज्या बातम्या