जाहिरात
मराठी बातम्या / मनी / LOCKDOWN 2 : घरबसल्या खरेदी करा स्वस्त सोनं, 20 एप्रिलपासून मोदी सरकार सुरू करणार विक्री

LOCKDOWN 2 : घरबसल्या खरेदी करा स्वस्त सोनं, 20 एप्रिलपासून मोदी सरकार सुरू करणार विक्री

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोनं 1,425.40 डॉलर प्रति औंस झालंय तर चांदी 16.58 डॉलर प्रति औंस झालीय.

आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयाॅर्कमध्ये सोनं 1,425.40 डॉलर प्रति औंस झालंय तर चांदी 16.58 डॉलर प्रति औंस झालीय.

भारतीय रिझर्व्ह बँकेचा सल्ला घेऊन भारत सरकारने सॉव्हेन गोल्ड बाँड स्कीम 2020-21 (Sovereign Gold Bond Scheme) जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 14 एप्रिल : पंतप्रधा नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संक्रमण रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्याची (Lockdown-2) घोषणा केली आहे. यादरम्यान ज्यांना सोनेखरेदी करायची आहे ते घरबसल्या ही खरेदी करू शकता. भारतीय रिझर्व्ह बँकेचा सल्ला घेऊन भारत सरकारने सॉव्हेन गोल्ड बाँड स्कीम 2020-21 (Sovereign Gold Bond Scheme)  जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. सॉव्हरेन गोल्ड बाँड 20 एप्रिल ते 2 सप्टेंबरपर्यंत सहा टप्प्यांमध्ये जारी करण्यात येतील. (हे वाचा- सोन्याचे दर गाठणार उच्चांक! वर्षाअखेरीस 55 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता ) सॉव्हरेन गोल्ड खरेदी करण्यासाठी पहिला टप्पा 20 ते 24 एप्रिल दरम्यान असणार आहे. याअंतर्गत कमीत कमी 1 ग्रॅम सोन्याची गुंतवणूक करता येऊ शकेल. यामध्ये गुंतवणूक करताना तुम्ही एका आर्थक वर्षामध्ये 500 ग्रॅम सोन्याचे बाँड खरेदी करू शकता. कमीतकमी गुंतवणूक 1 ग्रॅमची आहे. या स्कीमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुम्ही तुमचा टॅक्स वाचवू शकाल. त्याचप्रमाणे या योजनेत गुंतवणुकीवर वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळेल. सॉव्हरेन गोल्ड म्हणजे काय? या योजनेची सुरूवात नोव्हेंबर 2015 मध्ये झाली होती. फिजिकल गोल्ड (Physical Gold)च्या मागणी कमी करणे त्याचप्रमाणे घरगुती बचतीऐवजी वित्तिय बचत करण्यास प्रोत्साहन देणे, हे याचं उद्दिष्ट्य आहे. घरामध्ये सोने खरेदी करून साठवून ठेवण्याऐवजी तुम्ही सॉव्हरेन गोल्डमध्ये गुंतवणूक करू शकता आणि टॅक्स देखील वाचवू शकता. इथे कराल सॉव्हरेन गोल्डची खरेदी Sovereign Gold Bond ची विक्री बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, निवडण्यात आलेले पोस्ट आणि एनएसई तसच बीएसईच्या माध्यमातून होते. यातील कोणत्याही ठिकाणी जाऊन तुम्ही बाँड योजनेमध्ये सामील होऊ शकता. भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून गेल्या 3 दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या देण्यात आलेल्या किंमतीच्या आधारे या बाँडच्या किंमती ठरतात. आता याकरता ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट करता येणे शक्य आहे. ऑनलाइन अर्ज आणि पेमेंट केल्यास प्रत्येक बाँडमधील प्रति तोळा सोन्यावर 50 रुपयांची सूट देण्यात आली आहे. संपादन- जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात