जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'तोड़ देंगे तुम्हारे शरीर का कोना कोना, मगर...', पोलिसांचा हा VIDEO पाहून तुम्ही घराबाहेर पाऊलही नाही टाकणार

'तोड़ देंगे तुम्हारे शरीर का कोना कोना, मगर...', पोलिसांचा हा VIDEO पाहून तुम्ही घराबाहेर पाऊलही नाही टाकणार

'तोड़ देंगे तुम्हारे शरीर का कोना कोना, मगर...', पोलिसांचा हा VIDEO पाहून तुम्ही घराबाहेर पाऊलही नाही टाकणार

देशात कोरोनाव्हायरसची प्रकरणे सतत वाढत आहेत. मात्र असे असले तरी, लोकं अद्याप याकडे गांभीर्याने पाहत नाही आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 13 एप्रिल : देशात कोरोनाव्हायरसची प्रकरणे सतत वाढत आहेत. शेकडो लोक असुरक्षित आहेत. हजारो लोक रुग्णालयात कोरोनाशी झुंज देत आहेत. कोरोना वॉरियर्स म्हणजेच वैद्यकीय कर्मचारी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. त्याचबरोबर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीही सरकार तयार आहे. यासाठी लॉकडाऊनही घोषित करण्यात आला आहे. मात्र असे असले तरी, लोकं अद्याप याकडे गांभीर्याने पाहत नाही आहेत. घराबाहेर पडून स्वत:चा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. यासाठी पोलीस रात्रंदिवस गस्त घालत आहेत. अशातच एका पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत. आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत लोकांना घरात राहण्याचे आवाहन करत आहे. या व्हिडीओ पोस्ट करताना संजय सिंह यांनी, या पोलिस कर्मचाऱ्याच्या बोलण्याचा तुमच्यावर परिणाम झाला नाही. तर, तुम्हाला वाचवणे अवघड आहे. या भावाचे ऐका, असे भावनिक आवाहन केले आहे. वाचा- COVID-19: लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात मिळणार थोडीफार सूट, हा आहे सरकारचा प्लान

जाहिरात

वाचा- महाराष्ट्रात धोका वाढला, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2064 वर खासदार संजय सिंह यांनी अपलोड केलेल्या व्हिडीओमध्ये एक पोलिस लॉकडाऊन दरम्यान गस्त घालताना दिसत आहे. यावेळी ते, तोड़ देंगे तुम्हारे शरीर का कोना कोना, मगर होने न देंगे तुमको कोरोना, असे म्हणत आहेत. त्यामुळे त्यांचे म्हणणे ऐकून तरी, घरात थांबा असे आवाहन संजय सिंह यांनी केले आहे. वाचा- ‘आम्हाला वाचवा नाहीतर…’, पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी जगासमोर मागितली भीक दुसरीकडे, दिल्लीच्या साकेत येथे असलेल्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये कार्यरत दीडशे लोकांनी स्वत: ला क्लारंटाइन केले आहे. हे सर्व लोक दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आले, असे म्हटले जात आहे की या दीडशे लोकांपैकी डॉक्टर आणि परिचारिका यांची संख्या जास्त आहे. संपादन-प्रियांका गावडे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात