मराठी बातम्या /बातम्या /Viral /

रस्त्यावर सांडलेलं दूध जेव्हा माणूस आणि कुत्रे एकाचवेळी पितात तेव्हा..., निशब्द करणारा VIDEO

रस्त्यावर सांडलेलं दूध जेव्हा माणूस आणि कुत्रे एकाचवेळी पितात तेव्हा..., निशब्द करणारा VIDEO

लॉकडाऊनमुळे उपाशी असलेला माणूस रस्त्यावर सांडलेलं दुध ओंजळीत घेतो आणि त्याच्याजवळ असलेल्या भांड्यात टाकतो.

लॉकडाऊनमुळे उपाशी असलेला माणूस रस्त्यावर सांडलेलं दुध ओंजळीत घेतो आणि त्याच्याजवळ असलेल्या भांड्यात टाकतो.

लॉकडाऊनमुळे उपाशी असलेला माणूस रस्त्यावर सांडलेलं दुध ओंजळीत घेतो आणि त्याच्याजवळ असलेल्या भांड्यात टाकतो.

  • Published by:  Suraj Yadav
लखनऊ, 14 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे जगभरातील माणसं घरात अडकली आहेत. श्रीमंत असो की गरीब सर्वांनाच याचा फटका बसत आहे. या काळात डोळ्यात पाणी आणणाऱ्या अनेक हृदद्रावक घटना घडल्या आहेत. अगदी अमेरिकेपासून ते भारतातल्या खेड्यापर्यंत लोकांना कोरोनाशी लढताना संघर्ष करावा लागत आहे. आई-वडिलांची शेवटची भेट न झालेले, उपचाराअभावी लेकराचा मृत्यू यांसारख्या अनेक घटनांनी डोळ्यात पाणी आणलं आहे. असाच एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा शहरातला हा व्हिडिओ आहे. यामध्ये रस्त्यावर सांडलेलं दूध एक माणूस आणि भटकी कुत्री एकाचवेळी पीत असताना दिसत आहे. आग्रा शहरातल्या रामबाग चौकातला हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका दूधवाल्याचे कॅन रस्त्यावर पडले आणि त्यातलं दूध सांडलं. त्यानंतर माणूस आणि रस्त्यावर भटकणारी कुत्री ते दूध प्यायला लागले. निशब्द करणारा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दिसतं की,लॉकडाऊनमुळे उपाशी असलेला माणूस दुध ओंजळीत घेतो आणि त्याच्याजवळ असलेल्या भांड्यात टाकतो. तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावरचं तेच दूध कुत्रे चाटत आहेत. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. त्यामुळे करण्यात आलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन पुढे वाढवला जाणार आहे. दरम्यान, देशातील महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल, ओडिसासह इतर काही राज्यांनी लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवला आहे.  गेल्या 24 तासात देशामध्ये 905 कोरोनाचे रुग्ण आढळले तर 51 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत देशात 324 जणांचा मृत्यू झाला असून 980 जण ठणठणीत बरे झाले आहेत. हे वाचा : बादशाहच्या 'गेंदा फूल'वर या मुलीचा VIDEO VIRAL, जॅकलिनलाही टक्कर देतील अशा अदा
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या