मोदींनी LOCKDOWN 2 ची घोषणा केल्यानंतरची ही गर्दी. सोशल डिस्टन्सिंग, जमावबंदी असे सगळे नियम पायदळी तुडवत ही एवढी गर्दी उसळली ठाण्याजवळच्या मुंब्र्यामध्ये.
14 एप्रिलला सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन किमान 3 मे पर्यंत वाढवल्याची घोषणा केली.
मोदींच्या या घोषणेनंतर उतावीळ झालेले परप्रांतीय कामगार, बेघर मजूर रस्त्यावर उतरले. आम्हाला गावी जाऊ द्या, अशी त्यांची मागणी होती.
ठाण्याजवळ मुंब्रा इथे हे मजूर वेगवेगळ्या वसाहतींमध्ये आणि मिळेत त्या जागी राहात आहेत. काम नसल्यामुळे उपासमार होते आहे.
मुंब्रा नाका इथे कामगार आणि परराज्यातील मजुरांनी रस्त्यावर उतरुन गोंधळ घातला. त्यांना इथे रहायचे नसून आपल्या गावी परत पाठवा असा आरडा ओरडा हे कामगार करु लागले.