मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

तालिबाननं दानिश सिद्दीकींची हत्या कशी केली? सुन्न करणारी माहिती आली समोर

तालिबाननं दानिश सिद्दीकींची हत्या कशी केली? सुन्न करणारी माहिती आली समोर

पुलित्झर पुरस्कार विजेते (Pulitzer Prize winner) भारतीय फोटो पत्रकार (Indian Photo Journalist) दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांची काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली होती.

  • Published by:  News18 Desk

वॉशिंग्टन, 30 जुलै: पुलित्झर पुरस्कार विजेते (Pulitzer Prize winner) भारतीय फोटो पत्रकार (Indian Photo Journalist) दानिश सिद्दीकी (Danish Siddiqui) यांची काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली होती. दानिश सिद्दीकीची हत्या जाणूनबुजून करण्यात आली नसल्याचा दावा तालिबाननं (Taliban) केला होता. पण सिद्दीकी हे चुकून मारले गेले नाहीत, तर त्यांना शोधून तालिबान्यांनी त्यांची निर्घृण हत्या केल्याचा दावा एका अमेरिकन माध्यमानं (American Media) केला आहे. एका मशिदी लपून बसलेल्या दानिश यांना तालिबान्यांनी शोधून काढलं. त्यानंतर त्यांची ओळख पटवली आणि मग त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

38 वर्षीय दानिश सिद्दीकी एक फोटो पत्रकार म्हणून अफगाणिस्तानला गेले होते. दरम्यान तालिबान आणि अफगान सैन्यात सुरू असलेल्या युद्धाला ते कव्हर करत होते. दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. वॉशिंग्टन एक्झामिनरच्या वृत्तानुसार, पाकिस्तान सीमारेषेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अफगाण सैन्य आणि तालिबान यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला कव्हर करण्यासाठी सिद्दीकी अफगाणिस्तानच्या लष्कराच्या टीमसोबत स्पिन बोल्डक भागात गेले होते. या हल्ल्यादरम्यान सिद्दीकीला दुखापत झाली. त्यामुळे ते आणि त्यांची टीम एका स्थानिक मशिदीत आसरा घेण्यासाठी गेले.

हेही वाचा-दाऊदच्या गर्लफ्रेंडला व्हायचंय पाकिस्तानचा पंतप्रधान; इम्रान खानवर आहे फिदा

याठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आला. पण एक पत्रकार मशिदीत असल्याची माहिती बाहेर येताच तालिबान्यांनी मशिदीवर हल्ला केला. सिद्दीकी आपल्या टीमसोबत मशिदीत आसरा घेत असल्यामुळेच तालिबान्यांनी मशिदीवर हल्ला केल्याचं स्थानिक तपासात समोर आलं आहे.

हेही वाचा-तालिबान्यांनी 100 निष्पाप अफगाणांना केले ठार, झेंडे फडकावून साजरा केला उत्सव

दानिश यांना पकडण्यात आलं तेव्हा ते जिवंत होते

संबंधित वृत्तात असंही म्हटलं आहे की, "तालिबाननं जेव्हा दानिश यांना पकडलं तेव्हा ते जिवंत होते. यानंतर तालिबाननं सिद्दीकी यांची ओळख पटवली. त्यानंतर त्यांची आणि त्यांच्या अन्या साथीदारांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेत एका कमांडरला देखील मारण्यात आलं आहे. कारण त्याने या टीमला वाचवण्याचा प्रयत्न केला होता." तालिबान्यांनी दानिश याचं डोकं चिरडल्यानंतर त्यांनी गोळ्या घातल्याचा दावा देखील या अहवालात करण्यात आला आहे.

First published:

Tags: Afghanistan, Murder, Taliban